सातारा प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून सातारा येथील मेडिकल कॉलेजच्या नामांतराबाबत चांगलीच चर्चा केली जात होती. त्यामुळे शासकीय मेडिकल कॉलेजला कोणते नाव दिले जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहगिले होते. अखेर या कॉलेजचा नामाधिकरणाचा विषय आता सुटला आहे. सातारा मेडिकल कॉलेजचे नाव आता छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय असे करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश राज्य शासनाच्यावतीने आज आयुक्तांना देण्यात आले आहेत.
सातारा शहरात प्रशस्त असे शासकीय मेडिकल कॉलेज उभारण्यात आले आहे. सातारा शहरात राज्यातील आदर्शवत असे महाविद्यालय आणि ५०० खाटांचे रुग्णालय सुरु होत असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना यामध्ये मेडिकलचे शिक्षण घेता येणार आहे. हा सातारा जिल्ह्यातील एक प्रकरचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असल्याने या याठिकाणी मेडिकल शिक्षणाबाबतच्या सर्व सुविधा असाव्यात म्हणून स्थानिक नेत्यांकडून खूप प्रयत्न केले गेले.
मात्र, या प्रशस्त अशा शासकीय मेडिकल महाविद्यालयाच्या नामाधिकारनाच निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला नव्हता. अखेर राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाला राज्य शासनाच्या वतीने आज आदेश देण्यात आले. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा या संस्थेचे “छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा” असे नामाधिकरण करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अखेर अनेक दिवसापासून नवाधिकारणाच्या प्रतीक्षेत असलेल्या शासकीय मेडिकल कॉलेजचा नामाधिकारणाचा विषय मार्गी लागला आहे.