कराडच्या छत्रपती शिवाजी स्टेडीयमच्या नुतनीकरणासाठी राज्य सरकारकडुन 96 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड येथील छत्रपती शिवाजी स्टेडीयमच्या नुतनीकरणासाठी राज्य सरकारकडुन 96 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या या निधीतून स्टेडियमचे नूतनीकरणाचे काम केले जाणार आहे. कराड येथील छत्रपती शिवाजी स्टेडीयमच्या नुतनीकरणामुळे स्टेडीयमचे रुपडे पालटणार असुन खेळाडुंचीही चांगली सोय होणार आहे.

कराड येथे खेळाडुंच्या सोयीसाठी पालिकेकडुन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची उभारणी करण्यात आली आहे. त्यामाध्यमातून खेळाडुंची सरावासाठी चांगली सोय झाली आहे. त्याचबरोबर येथील स्टेडीयमवर अनेक वर्षापुर्वी रणजीचे सामनेही झाले होते. त्यानंतर मात्र, त्या स्टेडीयमकडे दुर्लक्ष झाल्याने त्याच्या नुतनीकरणाची आवश्यकता होती. त्यासाठी मध्यंतरी कृषी प्रदर्शनाच्या उदघाटनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्यानंतर अतुल भोसले यांनी त्यांच्याकडे स्टेडीयमच्या नुतनीकरणासाठी निधीची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन राज्य सरकारने आऱाखडा सादर करण्याच्या सुचना केल्या होत्या.

त्यानुसार पालिकेकडुन संबंधित स्टेडीयमच्या नुतनीकरणासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यानुसार येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या नुतनीकरणाच्या निधीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने अतुल भोसले यांना पाठपुरावा केला होता.