सातारा प्रतिनिधी | राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहाबाग फाटा ता. वाई जि. सातारा गावचे हद्दीत वाई सुरूर रस्त्यावर असलेल्या धनश्री हॉटेल येथे शुक्रवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास अचानक धाडी टाकली. यामध्ये हॉटेल चालकासह 10 जणांना ताब्यात घेतले तसेच त्यांच्याकडून टेबले, खुर्च्या, विविध विदेशी दारुच्या बाटल्या असा एकूण 6 हजार 585 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
हॉटेल मालक तानाजी बापू गायकवाड रा. शहाबाग ता. वाई याच्या विरुदध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 (अ) (ब) अन्वये तसेच सदर हॉटेलमध्ये व परिसरात विना परवाना मद्य सेवन केल्याबद्दल 1) श्रेयस सुभाष सावंत (वय 26, रा. साकोनाका पोलीस लाईन, मुंबई) 2) दत्तात्रय आनंदा वाडकर (वय 31) 3) दिग्विजय शांताराम वाडकर (वय 23) 4) अभिषेक अशोक गायकवाड (वय 21) 5) वैभव लक्ष्मण वाडकर (वय 29) 6) मयुर महादेव वडकर (वय 24) सर्व रा. वयगांव ता. वाई, जि. सातारा) तसेच 7) ओमकार सुरेश दुधाणे (वय 24), 8) राहुल उर्फ आशिष सुभाष दुधाणे (वय 24), 9) सुमित भरत दुधाने (वय 28), 10) अमर संतोष दुधाने (वय 26, सर्वजण रा. खिगर ता. महाबळेश्वर जि. सातारा) यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 84 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सुनील चव्हाण संचालक, विभागीय आयुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन महिन्यात हॉटेल / ढाब्यांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, शुक्रवार दि. 06/10/2023 रोजी शहाबाग फाटा ता. वाई जि. सातारा गावचे हद्दीत वाई सुरूर रस्त्यावर असलेल्या हॉटेल धनश्री येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सातारा भरारी पथकाने रात्री 9.30 वाजण्या च्या सुमारास अचानक धाडी टाकल्या.
यावेळी हॉटेल चालक तानाजी बापू गायकवाड रा. शहाबाग ता. वाई याच्या विरुदध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 (अ) (ब) अन्वये तसेच सदर हॉटेलमध्ये व परिसरात विना परवाना मद्य सेवन केल्याबद्दल 1) श्रेयस सुभाष सावंत (वय 26, रा. साकोनाका पोलीस लाईन, मुंबई) 2) दत्तात्रय आनंदा वाडकर (वय 31) 3) दिग्विजय शांताराम वाडकर (वय 23) 4) अभिषेक अशोक गायकवाड (वय 21) 5) वैभव लक्ष्मण वाडकर (वय 29) 6) मयुर महादेव वडकर (वय 24) सर्व रा. वयगांव ता. वाई
जि. सातारा) तसेच 7) ओमकार सुरेश दुधाणे (वय 24), 8) राहुल उर्फ आशिष सुभाष दुधाणे (वय 24), 9) सुमित भरत दुधाने (वय 28), 10) अमर संतोष दुधाने (वय 26, सर्वजण रा. खिगर ता. महाबळेश्वर जि. सातारा) यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 84 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. गुन्हयात आरोपींच्या ताब्यातून टेवले, खुर्च्या, विविध बँडच्या विदेशी दारुच्या बाटल्या असा एकूण 6 हजार 585 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाईमध्ये सर्वश्री निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक किशोर नडे, सोमनाथ माने, सहा. दुनिरीक्षक महेश
मोहिते, जवान सागर आवळे, अरुण जाधव, आबासाहेब जानकर यांनी सहभाग घेतला.
दोन महिन्यात 10 हॉटेल/धाब्यांवर छापे अन् 80 जणांवर कारवाई
मागील दोन महिन्यात या विभागाकडून जिल्हयातील एकूण 10 हॉटेल/धाब्यांवर छापे टाकून 80 जणांविरुदध कारवाई करण्यात आली असून हॉटेल मालक व विना परवाना पिणा-यांकडून मा. न्यायालयाने एकूण 1 लाख 14 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.