सातारा प्रतिनिधी । भारतीय रेल्वेच्या ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’नंतर पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना दुसरी गाडी नसल्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होते. त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. मोठी गैरसोयीचा सामना करावा लागत होता. प्रवाशांकडून खासदार उन्मेशदादा पाटील यांना भेटून नविन गाडी सुरु करावी अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत खा. उन्मेश पाटील यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव व राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची नुकतीच भेट घेत त्यांना निवेदन देत रेल्वे सुरु करण्याची मागणी देखील केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत पुण्याला जाण्याऱ्या विद्यार्थी, पालंकासाठी अडचण दुर झाली असून अमरावती- सातारा दरम्यान 01155 ही विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे.
अमरावती ते सातारा अशा सुरु झालेल्या या गाडीमुळे एकमेव महाराष्ट्र एक्सप्रेस नंतर पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना दुसरी गाडी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून जेजुरी जाण्याऱ्या भाविकांची या गाडीमुळे मोठी सोय झाली आहे. अमरावती- सातारा अनारक्षित ही विशेष गाडी क्रमांक 01155 सुरू झाली आहे. सातारा येथून क्रमांक 01156 या गाडीचे आज सातारा येथून साडेचार वाजता सुटणार आहे.
अमरावती येथे दुसऱ्या दिवशी अकरा वाजता पोहोचेल. ही गाडी बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड,कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौड कॉर्ड लाइन, पुणे, जेजुरी, लोणंद आणि सातारा या स्थानकावर थांबेल. या गाडीत सर्व १४ डबे सामान्य द्वितीय श्रेणीचे असून प्रवाश्यांनी या गाडीचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे रेल्वे प्रशासनाने केले आहे.
जळगाव, पाचोरा तसेच चाळीसगाव येथून पुणे येण्यासाठी जाण्यासाठी महाराष्ट्र एक्सप्रेस शिवाय दुसरी गाडी नसल्यानें विद्यार्थ्यासह पालकांचे हाल होत होते. पुणे येण्यासाठी जाण्यासाठी नविन गाडी सुरु करावी अशी मागणी खासदार उन्मेशदादा पाटील यांचेकडे सात्यत्याने केली होती.यासाठी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी पाठपुरावा केला होता.त्यामूळे ही गाडी पुणे जाण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. या नविन गाडीमुळे नवविवाहितांसह भाविकांना जेजुरी जाण्यासाठी फायद्याची ठरली आहे. ही गाडी शेगाव व जेजुरी या दोन तीर्थस्थळ, शैक्षणिक हब पुणे जोडणारी असल्याने भाविकांसह पालकांनी खासदार उन्मेश पाटील यांचे आभार मानले.