ST महामंडळाकडून श्रावण सहलीसाठी महिलांसाठी ‘ही’ खास ऑफर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने अनेक प्रकारचे उपक्रम राबविले जातात. तसेच महिला, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, अपंग व्यक्तींसाठी अन्वएक प्रवासाच्या सवलती देण्यात येतात. महिलांना मोफत प्रवासाची सवलत दिली आहे. यानंतर आता एसटी प्रशासनाच्या वतीने खास श्रावणी सहलीसाठी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याअंतर्गत कराड तालुक्यातील महिलांसाठी या श्रावण सहलीसाठी एसटीने सवलतीच्या दरात महिलांसाठी बस उपलब्ध केल्या आहेत.

श्रावण महिन्यात खुपजण देवदर्शनासाठी जातात. त्यांना सुरक्षित प्रवास घडवा एवढीच अपेक्षा असते. प्रवाशी आणि विद्यार्थ्यांकडून सुरक्षित प्रवासाची सर्व प्रथम एसटीला प्राधान्य दिले जाते. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि श्रावण महिन्यात महिलाकडून केल्या जाणाऱ्या प्रवासाचा विचार करून एसटी महामंडळाने महिलांच्या श्रावण सहलीसाठी सवलतीच्या दरात एसटी बस उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. शनिवार व रविवार शालेय वाहतूक कमी असल्याने या दिवशी श्रावणी सहलीसाठी बस उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.

कराड तालुक्यातील ‘या’ गावातील महिलांनी लुटला श्रावण सहलीचा आनंद

कराड तालुक्यातील घारेवाडीच्या महिलांनी शासनाच्या सवलतीच्या दरात श्रावणी सहलीचा आनंद लुटला. गावातील ४६ महिला या सहलीत सहभागी झाल्या होत्या. घारेवाडीतील उमेद अभियानांतर्गत धुळेश्वर महिला ग्रामसंघ स्त्री सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. या संघाच्या माध्यमातून महिलांची श्रावणी सहल काढण्यात आली.