साताऱ्यातून कर्नाटकात जाणार्‍या एस.टी. बसेसना लागला ब्रेक

0
1189
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस चालकास कर्नाटकात मारहाण झाल्यामुळे दोन्ही राज्यातील बससेवा दोन दिवसांपासून बंद ठेवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सातार्‍यातून विजापूरसह कर्नाटकात जाणार्‍या इतर बससेवेला ब्रेक लागला आहे. यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

चित्रदुर्ग कर्नाटक येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालक व वाहकांना कर्तव्यावर असताना काही समाजकंटकांनी धक्काबुक्की करून काळे फासले. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्रीपासून महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी एसटी सेवा बंद झाली आहे. सातारा विभागातून सातारा आगाराच्या विजापूरसाठी दररोज 2 बसेस, मेढा आगाराची 1 बस, तर कराड आगाराच्या 2 बसेस जातात. परंतु, काळे फासल्याच्या घटनेनंतर या बसेस जत पर्यंतच धावत आहेत. तेथूनच परत माघारी फिरत आहेत. दरम्यान, गाणगापूर व हैदराबादला बस सेवा सुरळीत सुरू आहे.