सातारा प्रतिनिधी । पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या विठाई या राधानगरी-स्वारगेट एसटी बसने अचानक पेट घेतला. सोमवारी सकाळी सातारा जिल्ह्यातील आनेवाडी टोलनाक्याजवळ हि दुर्घटना घडली. एसटी चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील ३० ते ४० प्रवाशांचे प्राण वाचले.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून राज्य परिवहन महामंडळाची राधानगरी – स्वारगेट अशी एसटी बस निघाली होती. बसमधून सुमारे ३० ते ४० प्रवाशी प्रवास करीत होते. बस साताऱ्यातील आनेवाडी तोल नाक्याच्या परिसरात आली असता येथील उड्डाणपुलावरून निघाली असता बसने अचानक पेट घेतला. यावेळी बसमधील चालकाच्या हे लक्षात येताच त्याने प्रसंगावधान राखत बस जागीच थांबवली आणि बसमधील प्रवाशांना तात्काळ बसमधून उतरण्याच्या सूचना केल्या. प्रवाशांनी क्षणाचाही विलंब न करता लगेच बसमधून खाली उतरून बसपासून काही अंतरावर जाऊन थांबले.
Satara News : महामार्गावर चालत्या ST बसने घेतला अचानक पेट; पुढं घडलं असं काही…
साताऱ्याच्या आनेवाडी टोलनाक्याजवळील घटना pic.twitter.com/O9bzkcDpFp
— santosh gurav (@santosh29590931) June 12, 2023
बसला लागलेली आग इतकी भीषण होती कि बससह बसमधील साहित्यही जळून खाक झाले.अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ थांबवण्यात आली. बसला आग लागल्यामुळे परिसरात धुरांचे लोट पसरले होते. दरम्यान या घटनेची माहीत जवळच्या पोलीस ठाण्यास व अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी घटनस्थळी दाखल झाली तसेच पाण्याच्या साह्याने बसला लागलेली आग विझवण्यात आली. तोपर्यंत महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्यावरून वाहतूक वळवण्यात आली होती.