कराड प्रतिनिधी । प्रभू श्रीराम भक्तांसाठी कोल्हापूर आयोध्या एक्सप्रेस ट्रेन या महिन्यात सुरू होणार आहे. कोल्हापूर हून दि. १३ फेब्रुवारी रोजी अयोध्येला जाणाऱ्या या ट्रेनला कराड येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णेव आणि श्री. रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे नुकतीच केली आहे. याबाबत ‘हॅलो महाराष्ट्र’ने खा. श्रीनिवास पाटील यांच्याशी संवाद साधला असता आपण सातारासह कराड येथील भाविकांना देखील अयोध्येतील रामलल्लाचे दर्शन घेता यावे रेल्वेमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. यामध्ये कराड येथे रेल्वेस पाच मिनिटांचा थांबा देण्यात यावा जेणेकरून भाविकांना देखील अयोध्येस जात येईल अशी देखील मागणी केली असल्याचे खा. पाटील यांनी सांगितले आहे.
खा. श्रीनिवास पाटील म्हणाले की, सर्वसामान्य लोकांना रामलल्लाचे दर्शन घेता यावे यासाठी जर रेल्वे मंत्र्यांनी कोल्हापूरहून अयोध्येला जाणाऱ्या रेल्वेगाडीमध्ये कराड येथे पाच मिनिटांचा स्टॉप दिला. तर अनेक लोकांचा निश्चितपणे फायदा होईल. शिवाय उत्तर भारतात विटा, भराव, पुसेसावळी, कडेपूर या भागातून सोन्याचा व्यवसाय करणारी बरीचशी मंडळी याना देखील आपापल्या गावी व्यापाऱ्यांसाठी जात येईल. तसेच पुढील कित्तेक वर्षे भाविकांना प्रवास करता येईल.
कोल्हापूर ते अयोध्या विशेष ट्रेन फेब्रुवारीमध्ये सुरू होणार आहे. या ट्रेनला सांगली आणि सातारा येथे थांबा देण्यात आला आहे. विविध रेल्वे प्रवासी संघटना आणि रेल्वेचे डीआरयुसीसी सदस्य श्री. गोपाल तिवारी यांनी खा. श्रीनिवास पाटील यांना याबाबतीत माहिती दिली. या ट्रेनला कराड येथे थांबा देण्याची मागणी त्यांनी केली. मोठ्या संख्येने कराड, पाटण, वाळवा, शिराळा, पलूस या परिसरातील नागरीक तीर्थ यात्रेसाठी उत्तर भारतात प्रवास करतात. अयोध्येला, प्रभू राम यांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या या नागरिकांना प्रवासाची उत्तम सोय व्हावी म्हणून या ट्रेनला कराड येथे थांबा द्यावी, अशी मागणी होत असल्याचे तिवारी यांनी खा. पाटील यांना सांगितले.
लवकरच दोन्ही मंत्र्यांची भेट घेणार : खा. श्रीनिवास पाटील
कराड रेल्वे स्टेशन हे तालुक्याचे ठिकाण असून सुद्धा रिले रेल्वेची सोय या ठिकाणी आहे. सर्वसामान्यांसाठी या ठिकाणी जर एक खांब झाला तर तो अनेकांच्या सोयीचा होईल म्हणून मी रेल्वे मंत्र्यांकडे मागणी केली आहे. आता फक्त पत्र दिले आहे लवकरच रेल्वे मंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती खा. पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.
रेल्वेस थांबा दिल्यास प्रवाशांची चांगली सोय होईल : गोपाल तिवारी
अयोध्येचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन कराड रेल्वे स्थानकावर सध्याय सुरू करण्यात येणाऱ्या विशेष अयोध्या ट्रेनला थांबा देण्याची विनंती खा. श्रीनिवास पाटील यांनी रेल्वेमंत्र्याकडे केली आहे. कराड येथे या ट्रेनला थांबा मिळाल्यास कराडसह पंचक्रोशीतील भाविकांना देखील अयोध्येस जाता येईल, असे रेल्वेचे डीआरयुसीसी सदस्य श्री. गोपाल तिवारी ‘हॅलो महाराष्ट्र्र’ शी बोलताना म्हंटले.