श्रीनिवास पाटीलांनीही सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क;जनतेला केलं ‘हे’ आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघातही आज मतदान पार पडत आहे. खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी कुटुंबीयांसमवेत आपला मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी मतदान करावे. सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा माणूस दिल्लीला पाठवावा,” असे आवाहन खा. श्रीनिवास पाटील यांनी केले.

यावेळी पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, लोकशाहीमध्ये संविधानाने 18 वर्षे पूर्ण झालेल्यांना मतदानाचा अधिकार दिला आहे. संपूर्ण देशाची जडणघडण या मतदानाच्या माध्यमातून होते. प्रत्येकाने येऊन मतदानाचा हक्क बजावावा. आपल्या भविष्यामध्ये आपली सहानुभूती आणि प्रेरणा बाळगून दिल्लीमध्ये जाऊन आपल्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवणारा लोकप्रतिनिधी निवडून द्यावा.

खासदार श्रीनिवास पाटील यांनी कराड शहरातील पालिका शाळा नंबर तीन मध्ये आज मंगळवारी सहकुटुंब मतदान केले. राष्ट्रवादी माहिती तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष सारंग पाटील, त्यांच्या पत्नी रचनादेवी पाटील, नातू उपस्थित होते.