कराड प्रतिनिधि । श्री. संत सेना महाराज सकल समाज, कराड दक्षिण आणि भारतीय जनता पाटील कराड दक्षिणच्यावतीने मलकापूर येथील सोनाई मंगल कार्यालयात कौटुंबिक स्नेहमेळावा घेण्यात आला. भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. महायुती सरकारने नाभिक समाजाच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी श्री संत सेना महाराज केशशिल्पी महामंडळ निर्माण केले आहे. या महामंडळाच्या माध्यमातून समाजाच्या उत्कर्षासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे प्रतिपादन डॉ. भोसले यांनी केली.
यावेळी डॉ. भोसले म्हणाले, श्री संत सेना महाराज केशशिल्पी महामंडळाचा फायदा येणाऱ्या काळात समाजाला निश्चित होणार आहे. समाज बांधवांना स्वतःचा व्यवसाय निर्माण करण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध दिले जात आहे. याची माहिती आपल्या समाजातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे. या समाजाला बळकटी देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. राज्य सरकार व महामंडळाच्या माध्यमातून आपल्या समाजाला न्याय देण्याची भूमिका असून, महामंडळावरदेखील आपल्या समाजाचा प्रतिनिधी पोहोचवण्याचे काम करू असे अभिवचन दिले.
यावेळी डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते नाभिक समाजातील व्यावसायिकांना संच वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, महाराष्ट्र नाभिक संघाचे उपाध्यक्ष प्रकाश वास्के, किशोर काशीद, ज्येष्ठ नागरिक भीमराव वास्के, आनंदराव पवार, माजी नगरसेविका निर्मला काशीद, राजेंद्र यादव, दिगंबर वास्के, आण्णासाहेब काशीद, मनोज शिंदे, जीवन गायकवाड, बाळासाहेब यादव, भाजपा ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष भारत जंत्रे, धनश्री रोकडे, सुरेश पवार, विजय जगताप, भानुदास शिंदे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. अतुल भोसलेंनी फडणवीस यांच्याकडे ई-मेलद्वारे पाठवला
श्री संत सेना महाराजांच्या मंदिराचा माझ्याकडे देण्यात आलेला प्रस्ताव मी तातडीने उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेलद्वारे पाठवला आहे. आपण दिलेल्या प्रस्तावाचा शासन स्तरावर पाठपुरावा करुन, या मंदिराच्या उभारणीसाठी मी सर्वस्तरावर आटोकाट प्रयत्न करीन, अशी ग्वाही डॉ. अतुल भोसले यांनी यावेळी बोलताना दिली.