सातारा प्रतिनिधी । समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, सातारा कार्यालयाअंतर्गत सातारा जिल्ह्यातील अनुदानित, विना अनुदानित दिव्यांगांच्या एकूण २० विशेष शाळा, कार्यशाळा व अनाथ मतिमंद बालगृहातील दिव्यांग मुलांच्या क्रीडा स्पर्धा नुकत्याच उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, जिल्हा शल्यचिकीत्सक युवराज करपे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार आदी उपस्थित होते.
सातारा जिल्हास्तरीय दिव्यांग शाळातील मुला मुलींच्या क्रीडा स्पर्धेमध्ये मतिमंद प्रवर्गातील ३२ मुलांना, बहुविकलांग प्रवर्गातील १८ मुलांना, मुकबधीर प्रवर्गातील २२ मुलांना गोल्ड मेडल प्राप्त झाले. गोल्ड मेडल मिळविलेल्या मुलांचे नामांकन थेट नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी जाणार आहे.