सातारा प्रतिनिधी । ‘विकसित भारत संकल्प यात्रा वाई तालुक्यात सुरु आहे. चांदवडी येथे या यात्रेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून जिल्हा प्रशासनाच्यावतीने गावातच नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.
या यात्रेच्या निमित्ताने चांदवडी गावातील नागरिकांना केंद्र शासनाच्या योजनांबरोबर राज्य शासनाच्या योजनांचे लाभ, सेवा, प्रमाणपत्रे, दाखले वाटप करण्यात आले. त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत कार्ड, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, किसान क्रेडिट कार्ड, सुरक्षा विमा योजना, जीवनज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना, आरोग्य शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते.
या यात्रेसाठी एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून स्क्रीनवरून योजनांच्या ध्वनीचित्रफिती प्रसारित करण्यासह योजनांची माहिती देणाऱ्या हस्तपत्रिका वितरीत करण्यात आल्या. नागरिकांना कोणत्याही कार्यालयाचे हेलपाटे न मारता गावातच अर्ज व कागदपत्रांची पूर्तता करुन योजनांचा लाभ देण्यात येत आहे. यामुळे चांदवडी गावातील नागरिकांनी केंद्र व राज्य शासनाचे आभार मानले.