लोकशाहीच्या हक्काचं रक्षण केले जाते हा समाजाला विश्वास देण्यात पोलिस यशस्वी : विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी

0
226
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । समाजात पोलिसांनी आनंदाने काम करताना जनतेच्या दुःखावर फुंकर मारावी. त्यामुळे जनता आपल्यासोबत राहील आणि जनतेला पोलिस आपल्यासोबत असल्याचा विश्वास वाटेल. विधानसभा, लोकसभा निवडणूक ३० हजार पोलिसांच्या मदतीने एकही हिंसाचाराची घटना घडली नाही. कोल्हापूर राज्यात मतदानात एक नंबरवर असून, सातारा, सांगली त्यामागोमाग आहे. त्यातून लोकशाही येथे जिवंत असून, लोकशाहीच्या हक्काचं रक्षण केले जाते, हा समाजाला विश्वास देण्यात पोलिस यशस्वी झाले असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी (Sunil Phulari) यांनी केले.

कराड येथे जिल्हा पोलीस व कराड उपविभागीय पोलीस तसेच नागरिकांच्या वतीन केंद्र सरकारतर्फे दोनदा राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल श्री. सुनील फुलारी यांचा सोमवारी सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पाटणचे पोलिस उपअधीक्षक विजय पाटील, अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, बॅंकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, ॲड. संभाजीराव मोहिते, वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार, तालुका पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप उपस्थित होते.

यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी म्हणाले, “यापुढे मला पदक मिळण्यापेक्षा तरुण अधिकाऱ्यांना अशी पदके मिळावी. १०० दिवसांच्या कार्यक्रमात सातारा जिल्हा हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तो एक नंबरवर येण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा यावेळी फुलारी यांनी व्यक्त केली. यावेळी पोलिस अधीक्षक श्री. समीर शेख, ॲड. मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले. पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. रत्नाकर शानभाग, महेंद्र भोसले यांनी सूत्रसंचालन केले. श्री. ताशीलदार यांनी आभार मानले.