अभिनेता किरण मानेंनी Facebook Post करत साताऱ्यातील वर्षभराच्या आठवणी केल्या ताज्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । बिग बॉस ४ नंतर किरण माने हे नाव सतत चर्चेत आले. बिग बॉसमध्ये त्यांची एक वेगळी बाजूही प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मालिका, सिनेमांतील ऊत्तम अभिनयामुळे किरण माने नाव घराघरात पोहचलं. हे किरण माने मूळचे सातारचे होय. ते नेहमी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. बरेचदा या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार, आपली मतं लोकांसमोर ते मांडतात. सातारचा बच्चन अशी ओळख असलेल्या किरण माने यांनी नुकतीच एक फेसबुकवर पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी सरत्या वर्षाची सगळ्यात हृदयस्पर्शी आठवण !

किरण मनाई यांनी आज एक फेसबुक पोस्ट केली असून त्यामध्ये त्यांनी लिहले आहार की, ‘बिगबाॅस’मधनं सातार्‍यात आल्यावर माझी भव्य मिरवणूक निघाली. सरत्या वर्षाची सगळ्यात हृदयस्पर्शी आठवण ! त्याचदिवशी तिकडे माझ्यावर खोटे आरोप करून मला ज्या सिरीयलमधून काढुन टाकले ती सिरीयल टीआरपी नसल्यामुळे बंद होत होती… याला म्हणतात ‘पोएटिक जस्टिस’.

…या वर्षाची सुरूवातच भन्नाट झाली. एक जानेवारीला बिगबाॅसच्या घरात बिगबाॅस माझ्या खेळाची तारीफ करत मला मानवंदना देत होते… माझ्या नांवाचा गजर होत होता… त्यावेळी त्यामागच्या वर्षाची सुरूवात आठवून प्रचंड इमोशनल झालो होतो. भयानक कुटील कारस्थानाला आणि मोठ्या संकटाला सामोरा गेलो होतो. बिगबाॅसच्या दारातून खाली उतरून स्टेजवर आलो आणि कलर्स चॅनलचे हेड विराज राजे यांनी माझ्यापुढे ‘सिंधुताई माझी माई’ या सिरीयलची ऑफर ठेवली…

4 दिवसांत महेश मांजरेकरांचा फोन आला. त्यांनी ‘निरवधी’ सिनेमात एक महत्त्वपूर्ण भुमिका दिली. तो सिनेमा आज पूर्ण होऊन तयार आहे. ‘सिंधुताई’मधली अभिमान साठे ही भुमिका प्रचंड गाजली. त्यानंतर आत्तापर्यन्त दिग्दर्शक मिलिंद कवडे, हरीश इथापे आणि रविंद्र शिवाजी यांच्या तीन सिनेमांमध्ये भन्नाट भुमिका साकारल्या. हे सगळे सिनेमे नविन वर्षात रिलीज होतील. आणखी तीन नविन सिनेमांची शुटिंग्ज या येत्या नव्या वर्षात सुरू होतील.

युवक क्रांती दलाचा ‘लोकनायक जयप्रकाश नारायण पुरस्कार’, कशिश सोशल फाऊंडेशनचा ‘ग्लोबल आयकाॅन ऑफ इंडीया’ पुरस्कार, महात्मा फुले स्मृतीदिनानिमित्त ‘शब्दयोद्धा’ पुरस्कार, ऑलवेज हेल्पींग हॅंड फाऊंडेशनचा ‘महाराष्ट्र आयकाॅन २०२३’ पुरस्कार, स्पंदन परीवार कराडचा ‘स्पंदन’ पुरस्कार आणि अत्यंत प्रतिष्ठेचा ‘सम्यक पुरस्कार’…अशा अनेक पुरस्कारांनी घर आणि काळीज भरुन गेलं ! आपला भवताल आपल्याला पुन्हा गुलामगिरीकडे घेऊन चाललाय. या काळात सगळ्यात अवघड, पण गरजेचं असतं, पाठीचा कणा ताठ ठेवणं ! हे नविन पिढीत रूजवण्यासाठी मी परिवर्तनाच्या चळवळीत सामील झालो. शिव फुले शाहू आंबेडकरी आणि तुकोबारायांच्या विचारांच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर व्याख्यानं देत फिरलो…

यावर्षी काही महत्त्वाच्या पुस्तकांचे प्रकाशन माझ्या हस्ते झाले. माझा गझलकार मित्र वैभव कुलकर्णी उर्फ वैवकु यांच्या ‘मराठी गझल : आकृती आणि आशय’, डाॅ. प्रकाश कोयाडे लिखित कादंबरी ‘केदारनाथ’, मदन पाटील लिखित आणि संजय मेणसे संकलीत संक्षिप्त ‘अकथित सावरकर’ आणि जगदीश ओहोळ लिखित डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांवरील ‘बापमाणूस’ ! असं सगळ्या दृष्टीनं भरगच्च, माझं करीयर आणि व्यक्तीमत्व समृद्ध करणारं हे वर्ष होतं ! यापुढेही हा आलेख असाच चढता राहिल याची खात्री देतो, आपला किरण माने असे माने यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहले आहे.