जिल्ह्यात समता पंधरवडा 2024 अंतर्गत ‘बार्टी’तर्फे विशेष मोहिमेचे आयोजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । अनेकदा मागासवर्गीय व्यक्तीस पालकांमधील अज्ञान व योग्य मार्गदर्शनाचा अभाव इत्यादी कारणांमुळे विहीत कालावधीत जात प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांना संविधानिक अधिकारापासून वंचित रहावे लागते असे निदर्शनास आले आहे.त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन दि. २५ एप्रिल २०२४ पर्यंत समता पंधरवडा घोषित करण्यात आला असून जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सातारा या कार्यालयामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा जाती पडताळणी समिती सदस्य, स्वाती इथापे यांनी दिली आहे.

समता पंधरवडा कार्यक्रमामध्ये इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान मध्ये शिकणा-या सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी सातारा यांचेद्वारे पुढीलप्रमाणे विविध उपक्रम व शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे. विशेष त्रुटीपूर्तता मोहिम- दि. १५ एप्रिल २०२४ रोजी शैक्षणिक विषयक, दि. १६ एप्रिल २०२४ रोजी इतर विषयक, दि. १८ एप्रिल २०२४ रोजी निवडणुक विषयक व दि. १९ एप्रिल २०२४ रोजी सेवा विषयक प्रकरणांचे त्रुटीपूर्तता मोहिमेचे आयोजन केले आहे.

तालुकास्तरीय अभिलेख पडताळणी शिबिर दि. १५ ते १९ एप्रिल २०२४ या आठवड्यामध्ये कालावधीमध्ये समितीद्वारे जाती प्रमाणपत्र पडताळणी कामी तालुकास्तरीय शिबिरांमध्ये शालेय व महसुली पुराव्यांचे अभिलेख पडताळणी शिबीर आयोजित करण, मार्गदर्शनपर कार्यशाळा / बैठकांचे आयोजन- दि. १६ एप्रिल २०२४ रोजी सर्व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, समान संधी केंद्र समन्वयक, तालुका स्तरावरील समतादुत यांची ऑनलाईन कार्यशाळा / बैठक आयोजन करण्यात आलेले आहे.

दि. १५ ते १९ एप्रिल २०२४ या आठवड्यामध्ये तालुकास्तरावरती “सहज सुलभ जात पडताळणी शिबीर” आयोजित करण्यात येणार आहे. इ. तसेच या कालावधीमध्ये शिक्षणाधिकारी (प्राथमिक माध्यमिक) जिल्हा परिषद सातारा, सर्व गटशिक्षणाधिकारी पं.स. सातारा जिल्हा, तसेच सर्व तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांच्या समन्वयाने सर्व जिल्हा परिषद शाळा व सर्व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना विद्यार्थीदशेत जातो प्रमाणपत्र मिळण्यासाठी मार्गदर्शनपर बैठका / कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.

तसेच चालु वर्षी १२ वी शास्त्र अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यानंतर सन २०२४-२५ मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या ज्या मागासवगीय विद्यार्थ्यांनी समितीस जात पडताळणी साठी अर्ज केला आहे. परंतु अदयाप वैधता प्रमाणपत्र मिळालले नाही, अथवा ज्या विद्यार्थ्यांचे प्रकरण त्रुटीयुक्त आहे अशा सर्व विद्याध्यांनी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा या कार्यालयात दि. १५ ते १९ एप्रिल २०२४ रोजी किंवा त्यापूवी सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहुन श्रृटीपूर्तता करावी. असे आवाहन स्वाती इथापे यांनी केले आहे.