सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील 2 टोळीतील 5 जणांवर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून कारवाई करण्यात आलेली आहे. कोरेगाव तालुक्यातील विविध अशा प्रकारच्या मारामारी करुन दुखापत करणे, कोयत्या सारखे घातक शस्त्रे बाळगुन दुखापत करणे, अनुसुचित जाती व जमाती अत्याचार करणे आदी गुन्हे संबंधितांवर दाखल होती.
1) अथर्व अजय पवार (वय 19, रा. वसुधा पेट्रोलपंपाचे जवळ, ता. कोरेगाव), 2) तौफिक शब्बीर शेख (वय 20, रा. केदारेश्वर रोड, कोरेगाव, ता. कोरेगाव), 3) निरज तानाजी बोडरे उर्फ फक्की (वय 19, रा. केदारेश्वर रोड, ता. कोरेगाव) तर दुसरी टोळीतील टोळी प्रमुख 4) युवराज भरत जगदाळे (वय 22, रा. कुमठे, ता. कोरेगाव), 5) अथर्व सुशांत जगदाळे (वय- 21 वर्षे, रा. कुमठे, ता. कोरेगाव) अशी तडीपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्हयामध्ये कोरेगाव तालुक्यातील शरिराविरुध्दचे सात्यताने गुन्हे कारणारे टोळी प्रमुख १) अथर्व अजय पवार, २) तौफिक शब्बीर शेख ,३) निरज तानाजी बोडरे उर्फ फक्की यांच्यावर सातारा जिल्हयामध्ये गर्दी मारामारी करुन दुखापत करणे, कोयत्या सारखे घातक शस्त्रे बाळगुन दुखापत करणे, अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हे दाखल होते. तसेच दुसऱ्या टोळीतील सदस्य १) युवराज भरत जगदाळे व २) अथर्व सुशांत जगदाळे या आरोपींच्या टोळीविरुद्ध कारवाई करत त्यांच्याही तडिपारीबाबतचा प्रस्ताव कोरेगांव पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक एस. आर. बिराजदार यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे सादर केलेला होता.
वरील दोन्ही टोळयांची पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये सातारा जिल्हयातून दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे. नोव्हेंबर २०२२ पासुन ९ उपद्रवी टोळ्यांमधील २४ इसमांना तडीपार करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोलीस नाईक प्रमोद सावंत, पो. कॉ. केतन शिंदे, पोलीस कॉ. अनुराधा सणस यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.