सातारा जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांकडून पोलीस अधिकाऱ्यांना कलम 36 प्रदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी ।श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, मोहरम सण, आषाढी एकादशी यासह विविध सण व उत्सव साजरे केले जाणार आहेत. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 36 नुसार अधिकाराचा वापर करुन दि. 5 जुलै ते 19 जुलै या कालावधीत कायदा व सुव्यवस्था बंदोबस्तासाठी नेमलेल्या सर्व पोलीस अधिकारी यांना अधिकार प्रदान केले आहेत.

रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणूकीतील/पालखी/दिंडी किंवा जमावातील लोकांनी कशा रितीन चालावे, त्यांनी वागणूक किंवा वर्तणूक कशी ठेवावी, या विषयी निर्देश देणे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, मोहरम, बेंदुर सणाचे अनुषंगाने काढण्यात येणाऱ्या मिरवणूका / पालखी/दिंडी या कोणत्याही मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व उपासनेच्यावेळी कोणत्याही रस्त्यावरुन किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होऊ न देणे यासाठी योग्य ते आदेश देणे.

सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये घाट किंवा घाटावर सर्व धक्क्यांवर किंवा धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही रस्त्यात व रस्त्याजवळ ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविण्यास व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश वाद्य वाजविणे यांचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून ध्वनीक्षपेकाचा उपयोग करण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे यांचा यामध्ये कलम 36 मध्ये समावेश आहे.