सातारा जिल्ह्यात उन्हाळी हंगामात 3 हजार 619 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण

0
129
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या असली तरी ज्या-ज्या ठिकाणी पाणी मुबलक आहे, अशा ठिकाणी उन्हाळी हंगामात विविध पिकांची पेरणी करण्यात शेतकरी यशस्वी ठरले आहेत. जिल्ह्यातील सर्वसाधारण 4 हजार 804 हेक्टर क्षेत्रापैकी प्रत्यक्ष 3 हजार 619 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.

भुईमूग 2 हजार 699 हेक्टर तर मकाचे 509 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील शेतकरी रब्बी व खरीप हंगाम घेत असतात, मात्र उन्हाळी हंगाम हा कमी असतो. कारण ज्या शेतकर्‍यांकडे पाण्याचे साधन आहे असेच शेतकरी उन्हाळी हंगामात भुईमूग, मका, सोयाबीन पिकांची पेरणी करतात. मात्र जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच टंचाईच्या झळा तीव्र जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उन्हाळ्यातील पिकांना पाणी कमी पडू लागल्याने अनेक शेतकरी उन्हाळी हंगामाकडे वळत नाहीत.

जिल्ह्यात उन्हाळी हंगामाचे सर्वसाधारण 4 हजार 804 हेक्टर क्षेत्रापैकी प्रत्यक्ष 3 हजार 619 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. 75.35 टक्के पेरणीची टक्केवारी आहे. जिल्ह्यात उन्हाळी बाजरीची 32 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, खटावमध्ये 20 हेक्टर तर फलटण तालुक्यात 12 हेक्टर क्षेत्रावर बाजरी पेरण्यात आली आहे. मक्याचे 2 हजार 74 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून त्यापैकी पाटण 55, माण 196, फलटण 258 असे मिळून 509 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून त्याचे प्रमाण 24.54 टक्के आहे.

खरीप हंगामात सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र रब्बी व उन्हाळी हंगामातही आता सोयाबीन पिकाकडे शेतकरी वळू लागला आहे. पाटण तालुक्यात 29 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सोयाबीनची 93 टक्के पेरणी झाली आहे. उन्हाळी हंगामात भूईमूगाचे क्षेत्र वाढले असले तरी सोयाबीन क्षेत्र घटले आहे. मक्याची पेरणीही कमी झाली आहे.

उन्हाळी भुईमूगाची पेरणी 113 टक्के…

सातारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा उन्हाळी भुईमूगाकडे कल वाढला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यातच भुईंमूगाची पेरणी करत आहेत. सातारा 348, जावली 93, पाटण 204, कराड 347, कोरेगाव 158, खटाव 233, माण 186, फलटण 1 हजार 2, खंडाळा 245, वाई 233.80 असे मिळून 2 हजार 699 हेक्टर क्षेत्रापैकी 3 हजार 49 हेक्टर क्षेत्रावर भुईमूगाची पेरणी झाली असून, त्याचे प्रमाण 113 टक्के आहे.