उडतारे येथील जवान प्रवीण बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | उडतरे (ता. वाई) येथील जवान प्रवीण रमेश बाबर यांना गुवाहाटी (आसाम) येथे सेवा बजावत असताना गोळी लागून वीर मरण आले होते. आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद जवान प्रवीण बाबर हे सैन्य दलातील कमांडो फोर्समध्ये कार्यरत होते. त्यांचे वडीलांनी देखील सैन्य दलात सेवा केली होती. प्रवीण बाबर हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. गुवाहाटी (आसाम) याठिकाणी सेवा बजावत असताना बुधवारी पहाटे गोळी लागून त्यांना वीर मरण आले, त्यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी उडतारे या त्यांच्या मूळ गावी सकाळी आठ वाजता आणण्यात आले. गावातून त्यांच्या पार्थिवाची फुलांनी सजविलेल्या गाडीतून अंत्ययात्रा काढण्यात आली.

यावेळी ‘शहीद जवान प्रवीण बाबर अमर रहे, भारत माता की जय’, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी राज्यसभा खासदार नितीन पाटील, किसनवीर कारखाना उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचीम, तहसीलदार सोनाली मेटकरी, भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सातारा पोलीस दलाच्या वतीने मानवंदना गोळ्यांच्या फैरी झाडून देण्यात आली,त्यांच्या पश्चात वृद्ध आई,पत्नी,दोन मुली एक मुलगा एक भाऊ, असा परिवार आहे. शहीद जवान प्रवीण बाबर यांच्या लग्नाचा वाढदिवस मंगळवारी होता आणि बुधवारी त्याच्या निधनाची बातमी समजल्यावर सर्व उडतारे गावाला मोठा धक्का बसला होता यामुळे संपूर्ण वाई तालुक्यात मोठी हळहळल व्यक्त होत आहे.