कराड प्रतिनिधी । मलकापूर (ता. कराड) येथील कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसमधील कृष्णा सरिता बझारच्या चेअरमन पदी स्नेहल मकरंद राजहंस यांची व व्हाईस चेअरमन पदी संगिता संजय शेटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी कृष्णा महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले यांनी नवनियुक्त चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले म्हणाले, कृष्णा सरिता बझारचा नावलौकिक मोठा आहे. असाच नावलौकिक कायमस्वरूपी उंचावत राहावा यासाठी सर्वांनी मिळून जे प्रयत्न करत आहेत. ते प्रयत्न यापूढेही असेच सुरू ठेवावेत.
ऑक्टोबर २०२१ मध्ये कृष्णा सरिता बझारच्या नव्या अद्ययावत भव्य दालनाचे उद्घाटन डॉ. सुरेश भोसले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले होते. महिला सक्षमीकरण व त्यांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कृष्णा सरिता महिला बझारची स्थापना करण्यात आली आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या या संस्थेने सुरू केलेल्या बझारला ग्राहकांची मोठी पसंती मिळाली. या बझारचा आता विस्तार करण्यात आला आहे.
पूर्णपणे वातानुकुलित असलेल्या या प्रशस्त बझारमध्ये गृहपयोगी सामान व जीवनाश्यक वस्तू, किराणा तसेच नामवंत कंपन्यांची सौंदर्य प्रसाधने व ब्युटी प्रॉडक्ट्स, थाई, इटालियन, चायनीज फूडस्, बेबी केअर प्रॉडक्टस्, फ्रोझन फूड, ब्रँडेड चॉकलेट्स, बेकरी प्रॉडक्ट्स, हेल्थ प्रॉडक्टस्, फ्रूट ज्यूस अॅन्ड क्रश, कोल्ड्रिंक्स, खाद्यपदार्थ, मिठाई, स्नॅक्स, पूजा सामान, सर्व प्रकारचे भारतीय व परदेशी मसाले, डेअरी प्रॉडक्ट्स, आईस्क्रीम्स, डॉग फूड, शालेय गणवेश अशा प्रकारचे सर्व साहित्य एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहे