सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील मुख्य रस्त्यालगत अतिक्रमणे मोठ्या परमानता वाढलेली आहेत. रस्त्याच्याकडेला बंद अवस्थेत टपऱ्या, हातगाडे अनेक दिवसांपासून असल्याची गोष्ट पालिकेच्या निदर्शनास आली आहे. दरम्यान, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी त्या टपरीमालकांना सहा दिवसात अतिक्रमणास ठरत असलेले हातगाडे तत्काळ हटवून घ्यावे अशी मुदत दिली आहे. त्यानंतर टपरी दिसल्यास दंड आकारुन टपरी जप्त करण्यात येणार आहे. तशी नोटीस मुख्याधिकाऱ्यांनी शहरातील सर्व हॉकर्स धारकांना बजावली गेली आहे.
दरम्यान, सातारा वाहतूक शाखेच्यावतीने शहरात जे जे वाहतुकीला पथारीवाले अडथळा करतात त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. तहसील कार्यालयाच्या पाठीमागे पालिकेने मोकळी जागा केली होती. त्या जागेवर काहींनी आपले प्रस्तच तयार केले आहे. तेथे कोंबड्या, बकरी डांबून ठेवण्यासाठी वापर केला जात आहे. तर रिकाम्या जागेत काळी पिवळया जीप लावल्या जात आहेत. हॉकर्सवाले त्या जागेत जायला तयार नाहीत. तेथे ग्राहक येणार नाही, पालिका सुविधा देणार नाही हे कारण करत त्या जागेस नकार दर्शवला आहे.
दरम्यान, शहरात दररोज सकाळी वाहतूकीची कोंडी होत असते. त्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. त्याच अनुषंगाने सातारा शहर वाहतूक शाखेचे एपीआय अभिजित यादव यांच्या पथकाकडून जे जे विक्रेते रस्त्यात बसतात त्यांच्यावर कारवाई केली जाते. विशेष करुन कासट मार्केटच्या कोपऱ्यापासून ते आकार हॉटेलच्या समोरच्या रस्त्यावर काही विक्रेते संध्याकाळीही बसलेले असतात. अगोदरच ग्रेड सेरपेटरमधून येणारी वाहने आणि बाहेरच्या रस्त्याने येणारी वाहने त्यामुळे कोणाचा जीव जाण्याची भिती आहे.