कराडात रविवारी तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशनच्या रौप्यमहोत्सवानिमित्त ‘रजत जयंती ध्यान महोत्सव’

0
1

कराड प्रतिनिधी । हॅपी थॉट्स’ नावाने ओळखली जाणारी तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशन ही आध्यात्मिक सेवाभावी संस्था यंदा रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने तेजज्ञान फाउंडेशनच्या कराडमधील ज्ञान ध्यान केंद्रातर्फे रविवार, दि.1 डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात (टाऊन हॉल) ‘रजत जयंती ध्यान महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास माजी खासदार श्रीनिवास पाटील आणि शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजीत देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरु सरश्री यांनी जीवनात ध्यान व आध्यात्मिक साधनेचे महत्त्व पटवून देत लाखो लोकांच्या जीवनात आनंद आणि शांती निर्माण केली आहे.

तेजज्ञान फाउंडेशनतर्फे आयोजित हा महोत्सव ध्यानाच्या माध्यमातून जगभर शांतता आणि आनंद पसरवण्याच्या उद्दिष्टाला एक नवीन दिशा देईल. या महोत्सवात फाउंडेशन सर्व साधक, ध्यानप्रेमी आणि नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन ज्ञान ध्यान केंद्राच्या संयोजकांनी केले आहे.