लेफ्टनंट जनरल श्रींजय प्रताप सिंग यांचेकडून अमर जवान स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र वाहून अभिवादन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शहीद कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यान येथील अमर जवान स्मृतीस्तंभावर वीर शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या सर्वोच्च बलिदानाबद्दल पुष्पचक्र वाहून लेफ्टनंट जनरल श्रींजय प्रताप सिंग, युद्ध सेवा पदक, चीफ ऑफ स्टाफ, सदर्न कमांड, पुणे यांनी सन्मानपूर्वक अभिवादन केले.

यावेळी सैनिक स्कुल साताराचे प्राचार्य कॅप्टन के श्रीनिवासन, सातारा नगरपालीकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) सतेश हांगे, निवृत्त कर्नल गिरीधर कोळे, कर्नल संतोष यशवंत महाडिक यांच्या वीरमाता श्रीमती कालिंदा, कन्या कार्तिकी, वर्गमित्र, सोबत काम केलेले अधिकारी, निवृत्त सैनिक यांनीही पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहीली.

यावेळी शहीद कर्नल संतोष महाडीक यांच्या आई कालिंदी यांनी माझ्या मुलाचे देशासाठी दिलेले शौर्य व बलिदान न विसरणारे असून युवा पिढीसाठी प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली. जिल्हा प्रशासनाने व नगरपालीकेने केलेल्या स्मृती उद्यानाचे काम चांगले केले असे सांगून उपस्थितांनी शहीद कर्नल संतोष महाडीक यांच्या शौर्याच्या आठवणींना उजाळा दिला.

लेफ्टनंट जनरल श्रींजय प्रताप सिंग यांनी शहीद कर्नल संतोष महाडीक यांच्या आईची व मुलीची आस्थेने संवाद साधला. तसेच स्मृती उद्यानातील उभारण्यात आलेल्या शिल्पांची व वीर सैनिकांच्या नामोउल्लेख असलेल्या पाट्यांची पाहणी केली.
41 व्या राष्ट्रीय रायफलचे सेना मेडल कर्नल संतोष महाडिक यांना दि. 17 नोव्हेंबर 2015 रोजी जम्मु आणि काश्मिर मधील कुपवाडा येथे दशहतवाद्यांशी लढा देताना वीरमरण आले. कर्नल संतोष महाडीक यांना शौर्यचक्राने सन्मानित करण्यात आले आहे.