सातारा प्रतिनिधी | गणेशोत्सव व अन्य सर्व प्रकारच्या बंदोबस्तावेळी वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी करत असतात. शासनाच्या वतीने त्यांना योग्य त्या सेवा सुविधा मिळत असतात. त्यातून सामाजिक बांधिलकी म्हणून रयत स्वाभिमानी संघटनेचा सातारा येथील पदाधिकाऱ्यांच्या वतीने वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना शूज भेट देण्यात आले.
यावेळी सातारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव, रयत स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुशील कदम, जिल्हा उपाध्यक्ष सुमित साळुंखे, सचिव अभय जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष संदिप जाधव, अभिलाष बनसोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकीतून मिळालेल्या या अनोख्या भेटीमुळे वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचारी देखील भारावून गेले. त्यांनी रयत स्वाभिमानी संघटनेच्या सातारा येथील पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.