सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील विविध रस्ते कायमचे खड्डेमुक्त व्हावे यासाठी काँक्रिटीकरणाचा पर्याय निवडून त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. शहरातील सर्व समस्या सोडविण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले असून सातारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी आणि माझे सर्व सहकारी कटिबद्ध आहोत, असे मत भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.
श्रीमंत छ. शाहू उद्यान (गुरुवार बाग) येथील दर्शनी भागाची प्रशस्त भिंत बांधकामाचा शुभारंभ आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, दत्ताजी थोरात, माजी नगराध्यक्ष अशोक मोने, माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, धनंजय जांभळे, सौ. सुवर्णा पाटील, सौ. आशा पंडित, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, प्राची शहाणे, सुनीश शहा, डॉ. सचिन साळुंखे, निशा जोशी, अश्विनी हुबळीकर, रीना भणगे, यशवंत घोरपडे, फडतरे दाजी, विद्या आगाशे, विद्या सोडमिसे, प्रवीण मोने, विजय लोहार, किशोर पंडित, ओम ग्रुपचे सर्व सदस्य यांच्यासह प्रभागातील विविध मान्यवर, भाजपचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, पोवई नाक्यापासून सिव्हिल हॉस्पिटल ते जरंडेश्वर नाका, बॉम्बे रेस्टोरंट चौक, गोडोली नाका या रस्त्यांच्या रुदीकरणाचे काम यापूर्वीच मार्गी लावले आहे. पोवई नाका, कदम बाग ते वाढे फाटा या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे किल्ले अजिंक्यतारावर जणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण केल्याने पर्यटक व नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. शहरातील काही महत्वाच्या रस्त्यांच्या कॉकिटीकरणासाठीही निधी मिळवला आहे. शहरातील सर्वच रस्ते चकाचक करण्यावर भर दिला असून सातत्याने विविध प्रकारची विकासकामे मार्गी लावली जात आहेत.