पुणे – बंगळुरू महामार्गाचा ठेकेदार बदलणार; बांधकाम मंत्रिपद स्वीकारताच शिवेंद्रसिंहराजेंचं महत्वाचं विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पुणे – सातारा महामार्गाच्या अपूर्ण कामाची दखल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली आहे. या कामावरील ठेकेदार कंपनी ‘रिलायन्स’कडून काम काढून घेऊन दुसऱ्या कंपनीला देण्याचे नियोजन त्यांनी ठरवले आहे. याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुंबई अथवा दिल्ली येथे बैठक घेऊन हे काम काढून दुसऱ्या ठेकेदाराला देण्यात येणार आहे, असे महत्वाचे विधान सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रथमच सातारा जिल्ह्यात आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, की पुणे – बंगळुरू महामार्गातील पुणे ते सातारा दरम्यानच्या रस्ते विकासाची अनेक कामे अपुरी आहेत. याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. यासाठीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आपण भेट घेतली.

यावेळी त्यांनीही याची दखल घेत या कामावरील ठेकेदार कंपनी ‘रिलायन्स’कडून हेकाम काढून घेऊन दुसऱ्या कंपनीला देण्याचे ठरल्याचे सांगितले. याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुंबई अथवा दिल्ली येथे लवकरच याबाबत बैठक घेऊन हे काम काढून दुसऱ्या ठेकेदाराला देण्यात येणार आहे.