कराड प्रतिनिधी । राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinh Bhonsle) यांनी आज कराड दौऱ्याप्रसंगी कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसला भेट दिली. याठिकाणी त्यांनी सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले.
नुकत्याच झालेल्या खातेवाटपात सातारा – जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदी वर्णी लागली. या निवडीनंतर आज प्रथमच मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले कराड दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसला भेट दिली. यावेळी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर ना. भोसले यांनी सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले.
याप्रसंगी माजी आमदार आनंदराव पाटील, राजेश पाटील-वाठारकर, कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, संजय पवार, बंटी जाधव, उमेश शिंदे, सुरज शेवाळे, वसीम मुल्ला, धनाजी माने, पिनू जाधव, धनाजी जाधव, राहुल पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.