सातारा प्रतिनिधी | शासन दरबारी विविध विकासकामांसाठी भाजपचे पदाधिकारी पाठपुरावा करतात. त्यांची कामे व्हावीत, त्यांना कुठली अडचण येऊ नये यासाठी तसेच नागरिकांचे प्रश्न सुलभपणे सोडवले जावेत, यासाठी संपर्क मंत्री नेमलेले आहेत. त्यामध्ये त्यानुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर सातारा जिल्ह्याची तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर धाराशिव जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे.
भाजप महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राष्ट्रीय सदस्यता अभियानांतर्गत मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश कार्यशाळा नुकतीच पार पडली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपच्या संपर्क मंत्र्यांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार सातारा जिल्ह्यासाठी संपर्क मंत्री म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची निवड करण्यात आली आहे.
बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सहसंघटन मंत्री शिव प्रकाश, राष्ट्रीय सचिव पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर तसेच पदाधिकारी उपस्थित होते.