मंत्रीपद स्वीकारताच शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली ‘ही’ महत्वाची ग्वाही; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सार्वजनिक बांधकाम खाते या पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे. हे कॅबिनेट पद सर्वसामान्यांच्या विकासासाठी आहे. महाराष्ट्रातील रस्ते बांधकामांसह सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी पूर्ण बांधील राहू, माझे मंत्रीपद हे सर्वसामान्यांच्या विकासासाठी आहे. महाराष्ट्रातील दळणवळणाच्या पायाभूत सुविधा प्रगत करण्याबरोबरच सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी ही मी सातत्याने दक्ष राहील, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

मंगळवारी मंत्रालयात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कॅबिनेट पदाचा कार्यभार स्वीकारला या विभागाच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

मंत्रालयातील 602 क्रमांकाच्या दालनांमध्ये शिवेंद्रसिंहराजे सकाळी दाखल झाले आणि त्यांनी थेट कामकाजाला सुरुवात केली. आपल्या विभागाचा त्यांनी पहिल्या मीटिंगमध्ये आढावा घेतला .यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, शहराध्यक्ष विकास गोसावी, समर्थक राजूभैया भोसले व फिरोज पठाण हे उपस्थित होते.

दालनामध्ये येण्यापूर्वी शिवेंद्रसिंह राजे यांनी छत्रपती शिवराय, क्रांति सूर्य महात्मा ज्योतीराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि नंतर आपल्या दालनांमध्ये येऊन त्यांनी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली. तत्पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी भाजपच्या सदस्यांच्यावतीने काही विकासकामांचे प्रस्ताव दाखल करण्यात आले. या प्रस्तावांची माहिती घेऊन ते तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना शिवेंद्रसिंहराजे यांनी दिल्या.