कराड प्रतिनिधी । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने राज्यभरात शिवसंवाद मेळावा घेतला जात आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका थेट शिवसैनिकांपर्यंत पोहोचविली जात आहे. या पार्श्वभूमीवर पाटण विधानसभा मतदारसंघातील ढेबेवाडी येथे रविवार दि. 25 रोजी दुपारी 4 वाजता ‘शिवसंवाद’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यातून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची तोफ धडाडणार आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.
जिल्हाध्यक्ष कदम यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना रविवारी होणाऱ्या कार्यक्रमांबाबत माहिती दिली. यावेळी ते पुढे म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघामध्ये पक्षाचे संघटन वाढवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पाटण मतदार संघात शिवसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका थेट शिवसैनिकांपर्यंत पोहोचविली जाणार आहे.
रविवारी सुरुवातील खासदार संजय राऊत यांच्या हस्ते केसे पाडळी येथे शिवसेना शाखेचे उद्धघाटन केले जाईल. त्यानंतर मल्हारपेठ या ठिकाणी ४ कोटी ५० लाख रुपयांच्या विकासकामांचे उदघाटन, लोकार्पण कार्यक्रम, तसेच शिवसंवाद मेळावा होणार आहे.
शिवसंवाद मेळाव्यात मेळाव्याला पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख नितीन बानुगडे पाटील, सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शेखर गोरे, पाटण विधानसभा संपर्कप्रमुख प्रवीण शिंदे, जिल्हा संघटक गजानन कदम, पाटण विधानसभा सहसंपर्कप्रमुख सती काळगावकर आदींची उपस्थिती राहणार आहे. शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष कदम यांनी केले आहे.