कोयनेत शिवप्रताप तराफा दाखल; बामणोली, तापोळा भागातील दळणवळण सोयीचे होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | कोयनेच्या शिवसागर जलाशयात सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने नवीन ‘शिवप्रताप’ नावाचा तराफा दाखल झाला. या तराफ्यामुळे कोयनेतील बामणोली, तापोळा भागातील दळणवळण सोयीचे होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे यांच्या हस्ते या तराफा सेवेची चाचणी घेऊन सेवा सुरू करण्यात आली. यावेळी नगरसेवक प्रकाश शिंदे, गटविकास अधिकारी अरुण मरभळ, तापोळ्याचे सरपंच रमेश धनवडे, योगेश गारडे, जिल्हा परिषद महाबळेश्वर सुपरवायझर संपत नलावडे, संतोष पवार, मंगेश माने, सुभाष कदम, सीताराम धनावडे, राहुल भोसले, गणेश भोपळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाग असलेला हा सर्व परिसर कोयनेच्य शिवसागर जलाशयामुळे दुर्गम असला तरी निसर्गसंपन्न आहे. या भागातील बामणोली व तापोळा ही दोन महत्त्वाची बाजारपेठेची गावे आहेत. कोयनेच्या अलीकडील भागात जावळी तालुक्यातील बामणोलीसह बावीस गावे येतात तर कोयना, सोळशी नदीच्या संगमावर तापोळा वसलेले आहे. तापोळा हे विभागातील बाजारपेठेचे मुख्य गाव असून, या ठिकाणी जलपर्यटन मोठ्या प्रमाणात चालते.

पलीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावासह दुर्गम व लांब असलेले कांदाटी खोऱ्यातील जनतेला तापोळ्याशी जोडणारी एकमेव सेवा ही बोट सेवा आहे. अवजड मालाची वाहने, चारचाकी वाहने नदीच्या अलीकडे पलीकडे करण्यासाठी तराफा सेवा महत्त्वाची असून तापोळा, कोळघर, ही सोळशी व गाढवली या ठिकाणी ने, तराफ्यातून वाहतूक करता येते.त्यामुळे मोठी गैरसोय दूर होणार आहे