शिंगणापूर यात्रेत आज शिवपार्वती विवाह सोहळा;लाखो भाविक दाखल

0
200
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेस हळदी समारंभाने प्रारंभ झाला असून, शनिवारी शिवपार्वती विवाहसोहळा होणार आहे. तसेच आजच्या दिवशी शंभू महादेव मंदिर ते अमृतेश्वर मंदिराच्या शिखरास विधिवत पद्धतीने ध्वज बांधण्याचा सोहळा पार पडणार आहे. या दोन्ही सोहळ्यासाठी शिंगणापूरनगरीत लाखो भाविक दाखल होत आहेत.

शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेस उत्साहात प्रारंभ झाला आहे. चैत्र शुद्ध अष्टमीच्या दिवशी आज शंभू महादेव मंदिर ते बळीच्या मंदिरास मानाचे पागोटे (ध्वज) बांधण्याचा सोहळा पार पडणार आहे. हा नयनरम्य ध्वज सोहळा पार पाहण्यासाठी मंदिर परिसरात लाखो भाविक उपस्थित असतात. तर रात्री 12 वाजता मंदिरानजीक असलेल्या बोहोल्यावर शिवपार्वती विवाहसोहळा संपन्न होणार आहे. विवाहसोहळा व ध्वज सोहळ्यासाठी मराठवाडा, विदर्भातून लाखो वर्‍हाडी भाविक शिंगणापूरनगरीत दाखल होत आहेत. तसेच 8 व 9 एप्रिल (एकादशी व द्वादशी) हे यात्रेचे मुख्य दिवस आहेत. यात्रेसाठी येणार्‍या भाविकांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

शिंगणापूर यात्रा महाराष्ट्रातील मोठ्या यात्रांपैकी एक आहे. दरवर्षी यात्रेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येतो. यावर्षीही यात्रेच्या बंदोबस्तासाठी 2 पोलिस उपअधीक्षक, 40 पोलिस अधिकारी, 300 पोलिस कर्मचारी, 70 वाहतूक पोलिस, 400 होमगार्ड असा जवळपास 800 कर्मचार्‍यांचा फौजफाटा तैनात करण्यात आल्याची असल्याचे पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे यांनी दिली. याशिवाय नातेपुते मार्गावर तीन ठिकाणी, म्हसवड मार्गावर दोन ठिकाणी, तर दहिवडी, फलटण मार्गावर तीन ठिकाणी वाहनतळ तयार करून भाविकांच्या वाहनासाठी आठ ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे.