सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रात्रीच्या वेळेस एका कंपनीतून तब्बल 10 लाख 58 हजार 400 रुपयांच्या किमतीच्या तांब्याच्या फाॅईल्स अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर शिरवळ पोलिसांनी दोनच दिवसांत या घटनेतील आरोपींचा शोध घेवून चौघांना ताब्यात घेतले आहे.
अविनाश दिपक मछले ऊर्फ कोकाटे (वय २४), स्वप्नील महेश गारुंगे (वय २३, दोघेही रा. राजेंद्रनगर, ता. करवीर जि. कोल्हापुर), विनायक बाळासो गोसावी (वय ४२,रा.गुटकेश्वर कॉलनी शिंगणापुर कोल्हापुर), शिवाजी प्रभु तारे (वय ४२, रा. साळुंके कॉलनी, भारतनगर कॉलनी कोल्हापुर) अशी चार आरोपीना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिरवळ एमआयडीसीच्या हद्दीतील निसार ट्रान्सफॉर्मर प्रा.लि. या ट्रान्सफॉर्मर निर्मीती करणाऱ्या कंपनीत दि. १२ ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी ४ ते ५ चोरट्यांनी प्रवेश करुन चोरी करुन कंपनीत नवीन ट्रान्सफॉर्मर्स तयार करण्यासाठी वापरले जाणारे तांब्याच्या तारा व पट्टया तसेच बॉबीचे बन्डल एकुण १० लाख ५८ हजार ४०० रुपये किंमतीचे सुमारे १५१२ किलो चोरुन नेल्याची फिर्याद शिरवळ पोलीस ठाण्यात १४ ऑगस्ट रोजी दाखल केली होती.
या घटनेचा शिरवळ पोलीसांनी अवघ्या दोनच दिवसांत तपास करून या चोरीप्रकरणी अविनाश दिपक मछले ऊर्फ कोकाटे वय २४ वर्ष, स्वप्नील महेश गारुंगे, वय २३ वर्ष, दोघेही रा.५५५/५५४ ए बी वार्ड, एस.एस.सी. बोर्डाजवळ, राजेंद्रनगर, शिवाजी यूनिवर्सिटी कोल्हापुर ता. करवीर जि. कोल्हापुर, शिवाजी प्रभु तारे वय ४२ वर्ष हमनी रा. पिंटु शिखरे यांची खोली, साळुंके कॉलनी, भारतनगर कॉलनी कोल्हापुर मुळ रा. जिवळी ता. लोहारा जि.उस्मानाबाद व विनायक बाळासो गोसावी वय ४२ वर्ष रा.गुटकेश्वर कॉलनी शिंगणापुर कोल्हापुर अशा तीन आरोपी आणि एक खरेदीदार यांना ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा व सदर गुन्हयातील चोरीस गेला माल किंमती असल्याने अनोळखी आरोपी यांचा शोध घेणे करीता वरीष्ठ पोलीस अधिकारी यांनी शिरवळ पोलीस ठाणे कडील अधिकारी श्री चिमाजी केंद्रे, पोलीस उप-निरिक्षक सतिश आंदलवार, पोलीस उप-निरिक्षक शंकर पांगारे व अंमलदार सहा.पो.फौज अनिल बारेला, पोलीस हवालदार जितेंद्र शिंदे, सचिन वीर, सुरेश मोरे, पोलीस नाईक प्रशांत धुमाळ, पोकों मंगेश मोझर, अजित बोराटे, संग्राम भोईटे यांचे तपासपथके बनवुन तपासाचे मार्गदर्शन व सुचना दिल्या वरीष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनात शिरवळ पोलीस पथक यांनी वेगवेगळया ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून तसेच तांत्रीक व गोपनिय माहितीच्या आधारे कोल्हापुर येथून दोन संशयीतांना चौकशी साठी ताब्यात घेऊन विचारपुस केली.
अटक करणेत आलेल्या आरोपी यांनी त्यांनी तसेच त्यांचे इतर साथीदार यांनी मिळुन कोल्हापुर येथून रात्रीच्यावेळी गुन्हा घडल्या ठिकाणी येऊन कंपनीतील कॉपर चोरुन कोल्हापुर येथे घेऊन गेल्याची कबुली दिली. सदर आरोपी यांचे कडुन पोलीस तपासात प्राप्त माहितीच्या आधारे गुन्हयात वापरलेले वाहन पीकअप व त्याचा चालक त्याच प्रमाणे गुन्हयातील चोरीस गेलेला माल विकत घेणारा यास ताब्यात घेणेत आले. त्यांचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेला माल जप्त करणेत आला आहे. गुन्हयात वापरलेले वाहन पीकअप जीप व चोरीस गेलेला माल असा मिळुन सुमारे १३ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक बापू बांगर व उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण उपविभाग फलटण राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक नवनाथ मदने, सहा. पोलीस निरिक्षक चिमाजी केंद्रे, पोलीस उपनिरिक्षक सतिश आंदेलवार, पोलीस उपनिरिक्षक शंकर पांगारे , पोलीस उपनिरीक्षक अब्दुल बिद्री, सहा. पो.फौ. अनिल बारेला, पोलीस हवालदार जितेंद्र शिंदे, सचिन वीर, सुरेश मोरे, पोलीस नाईक प्रशांत धुमाळ, पोकों मंगेश मोझर, अजित बोराटे, संग्राम भोईटे यांच्या पथकाने केली .