कराड प्रतिनिधी । कराड येथील श्री. साईबाबा पालखी सोहळा समितीच्यावतीने श्री. दत्त जयंती उत्सवानिमित्त शिर्डी ते कराड साई पालखी सोहळा दि. २९ नोव्हेंबर ते दि. १४ डिसेंबर दरम्यान आयोजित केला आहे. शुक्रवारी, दि. २९ सकाळी साडेआठ वाजता श्री. दत्त मंदिर- लेंडीबाग, शिर्डी येथून साईबाबा पालखीचे कराडकडे प्रस्थान होईल.
पालखी सोहळाल्या शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अहमदनगरच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे-सोनटक्के, साई पालखी सोहळा समितीचे संस्थापक, अध्यक्ष उदयसिंह देसाई यांच्या उपस्थितीत पालखी पूजन व प्रस्थान होणार आहे.
पालखी कार्यक्रम पुढीलप्रमाणे- शिर्डी येथून साई पालखीचे प्रस्थान शुक्रवार (दि. २९) सकाळी साडेआठ वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार समारंभाने होणार आहे. दुपारी १२ वाजता साकुरी येथे तर, पिंपरी निर्मळ येथे रात्रीचा मुक्काम. शनिवार (दि. ३०) दुपारी १२ कोल्हार येथे विसावा व रात्री गुहा येथे मुक्काम. रविवार (दि. १ डिसेंबर) राहुरीला दुपारचा विसावा व नादागांव- शिघवे येथे मुकाम. सोमवार (दि. २) सावेडी नाका येथे दुपारचा विसावा व अहिल्यानगर (अहमदनगर) येथे मुक्काम. मंगळवार (दि. ३) दुपारी चास येथे विसावा व सुपा येथे रात्रीचा मुक्काम. बुधवार (दि. ४) वाडेगव्हाण येथे दुपारचा विसावा व शिरूर येथे मुकाम.
गुरुवार (दि. ५) आंबळे येथे दुपारचा विसावा व आंधळगाव येथे रात्रीचा मुक्काम. ओम शुक्रवार (दि. ६) चौफुला येथे दुपारचा विसावा व सुपे येथे रात्रीचा मुक्काम. शनिवार (दि. ७) मुर्टी येथे दुपारचा विसावा व रात्री निरा येथे मुक्काम. रविवार (दि. ८), लोणंदला दुपारचा विसावा व वाठार स्टेशन येथे रात्रीचा मुकाम. सोमवार (दि. ९) सातारा रोड येथे दुपारचा विसावा व कोरेगाव येथे मुकाम. मंगळवार (दि. १०) शिरंबे येथे दुपारचा विसावा व रहिमतपूर येथे मुक्काम.
बुधवार (दि. ११) दुपारी वाठार किरोली येथे दुपारचा विसावा व मसूर येथे मुक्काम. गुरुवार (दि. १२) शिरवडे येथे दुपारचा विसावा व कोपर्डे- हवेली येथे मुक्काम. शुक्रवार (दि. १३) विद्यानगर-कराड येथे दुपारचा विसावा व कराडमधील श्रीराम मंदिर येथे साई पालखी व साई भक्तांचा मुक्काम. शनिवार (दि. १४) कराड येथील श्रीराम मंदिरात दत्त जयंती उत्सव. त्यात चिपळूण येथील वृंदा फडके यांचे दुपारी ४ ते ६ कीर्तन तसेच आरती, प्रवचन, साईभक्ती गीतांचा कार्यक्रम व साईंचा भंडारा (महाप्रसाद) होईल. साई भक्तांनी या पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे. तसेच पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोबाईल नंबर ९८६००१९४४१ वर संपर्क साधण्याचे आवाहन साई पालखी सोहळा समितीतर्फे करण्यात आले आहे.