शेवरी सोसायटीच्या चेअरमनपदी ज्ञानेश्वर हिरवे यांची बिनविरोध निवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बिदाल प्रतिनिधी : माण तालुक्यातील शेवरी विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी ज्ञानेश्वर विठ्ठल हिरवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीच्या वेळी शेवरी विकास सेवा सोसायटीचे संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या निवडीनंतर ज्ञानेश्वर हिरवे बोलताना म्हणाले की शेवरी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे. सभासद संख्या व कर्ज वाटपासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणार आहे. सेंद्रिय शेतीच्या संदर्भात प्रशिक्षण शिबिर आयोजित करणार आहे.

यावेळी सोसायटीचे संचालक विठ्ठल राजगे,सौ सुरेखा हिरवे , प्रसाद राजगे, शिवाजी खरात,शाहू शंकर हिरवे, कैलास सावंत हे उपस्थित होते. या निवडीनंतर आमदार जयकुमार गोरे ,जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे , डॉ संदीप पोळ, सोमनाथ भोसले, हरीभाऊ जगदाळे, सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी या वेळी अभिनंदन केले.