माण खटावच्या दोघां भावांचा संघर्ष मिटला; जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचारात

0
43
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक सध्या सुरू असून निवडणुकीतील प्रचार वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान आठ विधानसभा मतदारसंघांपैकी मान खटाव विधानसभा मतदारसंघात सर्वात महत्त्वाचा चर्चेचा विषय ठरलेला भाजपचे आमदार जयकुमार कोरे व त्यांचे बंधू शेखर गोरे यांच्यातील वाद हा आता मिटलेला आहे.

माण-खटाव विधानसभा मतदारसंघात साधारण पंधरा ते वीस वर्ष दोन भावांमधला संघर्ष वारंवार पाहायला मिळाला आहे. जयकुमार गोरे विरुद्ध शेखर गोरे असा हा संघर्ष आजपर्यंत या मतदारसंघानेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. परंतु या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर आता जयकुमार गोरे यांना आमदार करण्यासाठी शेखर गोरे संपूर्ण ताकतीनिशी मैदानात उतरले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने तिकीट नाकारल्यानंतर शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा शेखर गोरे यांनी दिला होता. त्यानंतर त्यांनी राजकीय भूमिका जाहीर केली नव्हती. परंतु कुळकजाई येथे मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत अखेर शेखर गोरे यांनी त्यांचे बंधू जयकुमार गोरे यांचे विधानसभेला काम करणार असल्याचे जाहीर केले. तसेच खटाव तालुक्यातून विरोधी उमेदवार प्रभाकर घाडगे यांनी एक जरी मत जास्त घेतले तरी शेखर गोरे राजकीय संन्यास घेईल, असेही शेखर गोरे यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची डोकेदुखी वाढली

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर अखेर आता शेखर गोरे यांच्यामुळे माण खटाव विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपची ताकद वाढल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे या मतदारसंघात आता राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे.