शशिकांत शिंदेंच्या मतात होऊ लागली घट; उदयनराजेंची कॉलर लागली उडू…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूक २०२४ च्या(Satara Lok Sabha 2024 Result) मतमोजणीत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे व महायुतीचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यात काटे कि टक्कर पहायला मिळत आहे. उदयनराजे भोसले पहिल्या फेरीपासून पिछाडीवर होते. आता ते आघाडीवर येऊ लागले आहेत. शशिकांत शिंदे यांना आतापर्यंत 2 लाख 68 हजार 473 मते मिळाली आहेत. तर उदयनराजे भोसले यांना 2 लाख 63 हजार 190 मते पडली आहेत. सध्या मतमोजणीची 18 वी फेरी सुरू आहे.

सातारा लोकसभेसाठी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह १६ उमेदवार रिंगणात होते. खरी लढत ही भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यातच झाली. या दोघांनी मतदारसंघात प्रचाराचे रान उठवले होते. तसेच या दोघांसाठी राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरील नेत्यांनी सभा झाल्याने मतदारसंघात चुरस निर्माण झाली होती. भाजपला याठिकाणी सुरुवातीच्या कलानुसार धक्का बसला आहे. २३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून, दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा मतदारसंघात मतमोजणीस सुरुवातीपासूनच शशिकांत शिंदेंनी घेतलेली आघाडी कायम ठेवली. मात्र, आता त्यांच्या मतांच्या आघाडीत कल झालेला दिसून येत आहे.

शशिकांत शिंदेंची कार्यकर्त्यांनी काढली मिरवणूक

सातारा लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा मतांचा एकदा वाढत चालला आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी शिंदेंना खांद्यावर घेत त्यांची चक्क मिरवणूकच काढली. मात्र, त्यानंतर त्यांचे मताधिक्य घटू लागले आहे. दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण सरासरी 63.16 टक्के मतदान झाले. यामध्ये 18 लाख 89 हजार 740 मतदारांपैकी 11 लाख 93 हजार 492 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सर्वाधिक मतदान कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 67.59 टक्के इतके झाले. तर सर्वात कमी मतदान पाटण विधानसभा मतदार संघात 56.95 टक्के इतके झाले.

सातारा लोकसभेतील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी

कोरेगाव : 2 लाख 11 हजार 680 मतदान, 67.59 टक्के
कराड उत्तर : 1 लाख 94 हजार 29 मतदान, 65.34 टक्के
कराड दक्षिण : 1 लाख 98 हजार 633 मतदान, 65.65 टक्के
पाटण : 1 लाख 70 हजार 616 मतदान, 56.95 टक्के
सातारा : 2 लाख 10 हजार 656 मतदान, 62.74 टक्के
वाई : 2 लाख 7 हजार 878 मतदारांनी मतदान, 60.83