Satara Lok Sabha 2024 Result : शशिकांत शिंदे आघाडीवर; उदयनराजेंचं टेन्शन वाढलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतमोजणीला (Satara Lok Sabha 2024 Result) पोस्टल मतमोजणीने सुरुवात झाली असून मतमोजनीच्या सुरुवातीपासून महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना जोरदार धक्का बसू लागला आहे. उदयनराजे भोसले यांना आतापर्यंत 1 लाख 86 हजार 57 मते पडली असून शशिकांत शिंदे यांना 2 लाख 1 हजार 423 मते मिळाली आहेत. सुरुवातीपासून मतमोजणीत शिंदेंनी आघाडी घेतली आहे.

सातारा लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडी उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात लढत होत आहे. दोघांच्यात शिंदे मताच्या बाबतीत आघाडीवर असल्याने उदयनराजेंचं टेन्शन वाढू लागलं आहे. मिनिटामिनिटाला मतांची आकडेवारी बदलत असली तर या आकडेवारीत शिंदेचं पारडं जड असल्याचे दिसून येत आहे.

साताऱ्यातील मतदानाची आकडेवारी

सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण सरासरी 63.16 टक्के मतदान झाले. यामध्ये 18 लाख 89 हजार 740 मतदारांपैकी 11 लाख 93 हजार 492 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सर्वाधिक मतदान कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 67.59 टक्के इतके झाले. तर सर्वात कमी मतदान पाटण विधानसभा मतदार संघात 56.95 टक्के इतके झाले.

सातारा लोकसभेतील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी

कोरेगाव : 2 लाख 11 हजार 680 मतदान, 67.59 टक्के
कराड उत्तर : 1 लाख 94 हजार 29 मतदान, 65.34 टक्के
कराड दक्षिण : 1 लाख 98 हजार 633 मतदान, 65.65 टक्के
पाटण : 1 लाख 70 हजार 616 मतदान, 56.95 टक्के
सातारा : 2 लाख 10 हजार 656 मतदान, 62.74 टक्के
वाई : 2 लाख 7 हजार 878 मतदारांनी मतदान, 60.83