सातारा प्रतिनिधी । महविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर झालेल्या 4 हजार कोटी रुपयांच्या घोटाळयाविषयी भूमिका स्पष्ट केली. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत 2014 मध्ये शेतकऱ्यांसाठी राखीव असणाऱ्या भूखंडावर 466 गाळ्यांचे विनापरवाना बांधकाम आणि परस्पर विक्री करून 4 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा माझ्यावर आरोप करण्यात आला आहे. माझ्यावरील घोटाळ्याचे झालेले आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारणातून निवृत्ती घेईन, असे थेट आव्हान आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा साताऱ्याचे लोकसभेचे ‘मविआ’चे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी दिले.
साताऱ्यात लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, बाजार समितीतील त्याकाळचे ठराव, संचालक मंडळाने घेतलेले निर्णय यांची सर्व कागदपते माझ्याकडे आहेत. ती आज मी सर्वांसोमार ठरवत आहे. जे काही घोटाळ्याचे प्रकरण झाले असल्याचे सांगितले जात आहे. त्याबद्दल मी या पूर्वी देखील माझी भूमिका मांडली आहे. सत्तेतूत असल्याने माझ्यावर आरोप करणाऱ्यांकडून काहीही केले जाऊ शकते. मात्र, मी काही घाबरणारा माणूस नाही.
लढायला जेव्हा आपण उभे राहतो तेव्हा परिणामाची भूमिका बघूनच आपण लढत असतो. माझे आव्हान आहे कि असे हे रडीचे खोटे आरोप करण्यापेक्षा आपण जनतेच्या, न्यायालयाच्या मैदानात जाऊयात. तशापध्दतीने तुमची कारवाई करण्याची जी भूमिका आहे ती न्यायालयीन होऊ द्या ना एकदा. परंतु लोकांमध्ये गैरसमज करून द्यायचा. आजही माझे म्हणणे आहे कि जर ४ हजार कोठी रुपयांचा घोटाळा झाला तर माझ्या आयुष्यातील सगळ्या राजकारणातून मी निवृत्ती घेऊन टाकेन, असे शशिकांत शिंदे यांनी म्हंटले.
…तर बदनामीचा गुन्हा दाखल करणार
बाजार समितीतील आमचे संचालक मंडळ 2008 मध्ये अस्तित्वात आले आहे. तर व्यापाऱ्यांना गाळेवाटप हे 1990 मध्ये झालेले आहे. ह्या व्यापाऱ्यांना बाजार समितीतील त्यांचा वाढीव एफएसआय हवा होता, त्यामुळे त्यांनी बाजार समितीकडे अर्ज केला होता. बाजार समितीचे संचालक मंडळाने त्याच्यावर ठराव करून तो पणन मंत्रालयाला पाठवला होता. भाजपचे नेते तत्कालीन पणन मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्याला मान्यता दिली होती. या प्रस्तावाला पर्यावरण दिल्ली यांची मागणी घेतली होती.त्यानंतर सिडको महानगरपालिकेला योग्य तो कर भरला होता आणि बाजार समितीने व्यापाऱ्यांकडून चेक ने पैसे घेऊन ते खात्यावर भरलेले आहेत. हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. मग विरोधक चुकीचे आरोप कशासाठी करत आहेत? निवडणुकीनंतर खोटे आरोप करणाऱ्यांच्या विरोधात बदनामीचा गुन्हा दाखल करणार आहे, असा इशाराही शिंदे यांनी दिला.