हुकूमशाही विरुद्धच्या लढाईला कोरेगाव मतदारसंघातील स्वाभिमानी जनतेने सज्ज व्हावे : शशिकांत शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । “केंद्रातले राजकारण गल्लीत आणले आहे. त्यामुळे कोरेगाव मतदारसंघातील लोक तणावाखाली आहेत. ही कुठली लोकशाही? अशा या हुकूमशाही विरुद्धच्या लढाईला कोरेगाव मतदारसंघातील स्वाभिमानी जनतेने सज्ज व्हावे, असे म्हणत शरदचंद्र पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी एकनाथ शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

कोरेगाव तालुक्यातील जांब बुद्रुक येथे सरपंच रूपाली निकम, किरण निकम, संदीप निकम, जयवंतराव निकम, जनार्दन निकम यांच्यासह निढळ, कोडोली, क्षेत्रमाहुली येथील कार्यकर्त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. यावेळी आयोजित केलेल्या निश्चय सभेत आ. शिंदे यांनी आमदार महेश शिंदे याच्यावर निशाणा साधला. यावेळी माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, सतीश चव्हाण, घनश्याम शिंदे, राजेंद्र भोसले, अॅड. पांडुरंग भोसले, जयवंत घोरपडे, कल्याण भोसले, सुनील साबळे, भगवानराव घाडगे, नाना भिलारे, डॉ. नितीन सावंत, राहुल साबळे, प्रताप कुमुकले-निकम, संजना जगदाळे, प्रशांत गुरव, शिवसेना ठाकरे गटाचे पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख अमोल निकम, सुधाकर निकम, जयवंत जाधव, बाळू निकम, संतोष निकम, आकाश निकम, विष्णू शिर्के, भास्कर निकम आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार शिंदे म्हणाले, “माझ्याविरुद्धही खूप अपप्रचार केला गेला. मी वाशीमध्ये जाऊन निवडणूक करणार, अशा अफवा माझ्याविरुद्ध उठवल्या गेल्या. माझ्या कार्यकर्त्यांनाही त्रास दिला गेला. एवढेच नव्हे, तर मतदार यादीवर आक्षेप घेऊन लोकशाहीतील राजा असलेल्या मतदारांनाही त्रास दिला. अशा राजकारणाला आता जनता कंटाळली आहे. अशा परिस्थितीत आपण काही लोकांना रस्ता मोकळा ठेवला, तर पुन्हा हुकूमशाही लादल्यासारखे होईल.”

विधासनभा निवडणुकीमुळे सातारा जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. अशात काल भाजपकडून जिल्ह्यातील कराड दक्षिण, माण आणि सातारा जावळी विधानसभा मतदार संघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र, अद्यापही शरदचंद्र पवार आणि काँग्रेस कडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली नसली तरी त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरेगाव विधानसभा मतदार संघात शशिकांत शिंदे विरुद्ध महेश शिंदे अशी लढत होणार आहे. लवकरच दोघांच्या उमेदवारीची घोषणा होईल.