सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन काल साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात आमदार शशिकांत शिंदे यांनी चांगलीच टोलेबाजी केली.’मी लढवय्या कार्यकर्ता आहे. शरद पवारसाहेबांनी कसे लढायचे हे सांगितले आहे. कडवी झुंज दिली. थोडा कमी पडलो. पण मी माझ्यासाठी नेत्यासाठी लढलो आहे. तुतारी आणि पिपाणीमधल्या फरकाने हरलो. पण पराभवाला घाबरत नाही. शरद पवारांचा पठ्ठ्या आहे. अतृप्त आत्मा म्हणत होते. आता या आत्म्याने आज अनेकांना शांत बसवले आहे’, असा टोला शिंदे यांनी विरोधकांना लगावला.
यावेळी शिंदे पुढे म्हणाले की,”विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगलेच यश मिळाले पाहिजे. यासाठी राज्यात शरद पवार यांच्या विचाराची सत्ता आली पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये आपल्याबरोबर उद्धव ठाकरे आणि काँग्रेस असणारच आहे”. परंतु पक्षाला राज्यात चांगले यश मिळावे यासाठी या कार्यकर्त्यावर महाराष्ट्रातील जाबबादारी द्या.”
लंकेंची एवढी प्रसिद्धी झाली आहे की, पंतप्रधान मोदी देखील त्यांना…
यावेळी शशिकांत शिंदे यांनी निलेश लंकेंबाबत एक गमतीदार विधान केले. शिंदे म्हणाले की, नीलेश लंकेंची एवढी प्रसिद्धी झाली आहे की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्यांना ओळखतील”, शिंदे यांच्या या विधानाने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.