सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात संघटनात्मक बांधणी नव्याने करणार आहे. आगामी काळात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पूर्ण ताकदीने लढणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादीचे नेते आ.शशिकांत शिंदे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जिल्हा कार्यकारिणीची बैठक राष्ट्रवादी भवनात पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस माजी आमदार बाळासाहेब पाटील, प्रभाकर घार्गे, जिल्हा बँक संचालक सत्यजीत पाटणकर जिल्हाध्यक्ष सुनील माने, प्रभाकर देशमुख, दिपक पवार, देवराज पाटील, पार्थ पोळके, डॉ. नितीन सावंत, दिलीप बाबर, संगीता साळुंखे, अर्चना देशमुख, राजकुमार पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका झाल्या. निवडणूकीनंतर घेतलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. पक्ष मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात अॅक्टीव्ह करण्यात येणार आहे. सामाजिक विषयावर आवाजही वेळोवेळी उठवण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पाश्वर्र्भूमीवर संंघटनात्मक बांधणी केली जाणार आहे. माजी आमदार बाळासाहेब पाटील, प्रभाकर घार्गे यांच्यासह अन्य पदाधिकार्यांनी मनोगते व्यक्त केली.
या बैठकीत विधानसभेत पराभव का झाला? याविषयावर अनेकांनी आपली मते मांडली. तसेच ज्या ज्या तालुक्यात पदाधिकार्यांनी पदे घेतली आहेत. मात्र, त्याठिकाणी पक्षबांधणीही केली नाही. तसेच बहुतांश पदाधिकार्यांनी नावासाठी पदे घेतली आहेत, अशांना पदावरून हटवून त्या ठिकाणी नवीन पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रसाद सुर्वे, राजाभाऊ शेलार, मानसिंगराव जगदाळे, रमेश धायगुडे, गोरख नलावडे, सुरेश पार्टे, सतीश बाबर, संजना जगदाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.