नरेंद्र पाटलांच्या टीकेवर शशिकांत शिंदेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले की, उद्याच मी…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । महविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदेंनी (Shashikant Shinde) आज शरद पवार यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. “आज नरेंद्र पाटील यांनी माझ्यावर जी काही टीका केली. त्यांच्या टीका, आरोपांवर मी काही बोलणार नाही. त्यांना आहे काही उत्तर द्यायचे असेल तर माथाडी कामगारच देतील. त्यांना सत्तेवर बसवताना मी सहकार्य केलेले आहे. कालपासून माझ्यावर टीका करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. त्यात अजून एक भर पडलेली असल्याची प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी दिली.

साताऱ्यात लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते उपस्थित होते. शशिकांत शिंदे पुढे म्हणाले की, माथाडी संघटनेमध्ये काम करत असताना प्रत्येकजन आपापल्या पक्षासाठी काम करत असतो. ज्यावेळी महाविकास आघाडीतून उदयनराजे उभे होते त्यावेळी महाविकास आघाडीचा कार्यकर्ता म्हणून मी काम केले. आता त्यांना असं म्हणणार नाही कि त्यांनी माझं काम करावं. त्यासाठी माथाडी कामगार निर्णय घ्यायला सक्षम आहेत.

कुणाच्या मागे उभे राहायचे हे माथाडी कामगारांना चांगलंच कळत. या माथाडी कामगारांना जो अधिकारी दिला तो पवार साहेबानी दिला तर आताच्या घडीला त्याच्यावर कुणी अन्याय जर केला असेल तर तो या महायुतीने केलेला आहे. आता नरेंद्र पाटील काय बोलतात त्याकडे मी लक्ष येत नाही आणि मी त्यांच्याकडे लक्ष द्यावे एवढं महत्व मला काही वाटत नाही.

कालपासून एक ते दोन लोकांना कुणीतरी स्क्रीप्ट दिलेली दिसत आहे. मला एक कळत नाही कि भ्रष्टाचार झाला झाला असे हे लोक मी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दोन दिवस अगोदर बोलत आहेत. इतक्या दिवस कुठे होते? माझ्यावर झालेल्या आरोपांबाबत मी उद्या पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलणार आहे. जे देशात आणि राज्यात चालले आहार तेच या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मुतारीवर बोलणाऱ्यांनीच आत्महत्या करायला लावली

यावेळी शशिकांत शिंदे यांनी नरेंद्र पाटील यांच्यावर निशाणा साधत म्हंटले की, आज जे मुतारीवर बोलत आहे. त्यांनी एकेकाकी आत्महत्या करायला लावली त्यांचे कुटुंबीय समोर येऊन सांगतील कि कुणी त्यावेळी षडयंत्र रचले. असो राजकारणात कूटनीतीचा प्रकार होत असतो. अशावेळी आपण मात्र, सरळ चालत राहायचं असत. लोकांना माहिती असे कि पूर्वीचा आरोप कोर्टात फेटाळलागेला आणि आतासुद्धा फेटाळला गेला असल्याचे शशिकांत शिंदे यांनी म्हंटले.

नरेंद्र पाटील नेमकं काय म्हणाले?

माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी आज कराड येथे पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, “साताऱ्याच्या तुतारी चिन्हाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मुतारीचा घोटाळा केला आहे. हि गोष्ट खूप लांच्छनास्पद आहे. आणि अशा व्यक्तीला उमेदवारी मिळते यावर आम्ही पवार साहेबांना काही बोलूच शकत नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांनी पोटाच्या बेंबीच्या देठापासून मला विरोध केला होता. एका माथाडी चळवळीत आपण काम केल्यानंतर आजपर्यंत माझ्या कुटुंबीयांनी आणि आम्ही त्यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्या विजयाच्या दृष्टिकोनातून काम केले. शेवटचा विजय त्यांचा कोरेगाव मतदार संघातून झाला. परंतु २०२९ ला त्यांनी आमच्या ज्या काही सहकार्यांना हाताशी धरून ज्या पद्धतीने आमच्या विरोधामध्ये जे काही कटकारस्थान केले. त्याचे रिटर्न गिफ़्ट म्हणून कुठे तरी देण्याची संधी मला यानिमित्ताने आलेली आहे. निवडणुकीचा अजून बराचसा काळ बाकी आहे. त्यानंतर एक एक उलगडा आपण त्यावेळेला करू, असा इशारा यावेळी नरेंद्र पाटील यांनी दिला.