सातारा प्रतिनिधी । कालपासून राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget Session) सुरुवात झाली आहे. आज दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अधिवेशनात चर्चासत्रात खा. शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी मदतही कायदा कृती समितीच्या महत्वाची उपोषणास मुख्यमंत्र्यानी भेट देऊन मागण्यांबाबत चर्चा करावी तसेच विचारविनिमय करावा अशी विनंती केली.
यावेळी आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, “माथाडी कायदा कृती समितीच्या माध्यमातून मा. बाबा आढाव, मा. नरेंद्र पाटील असे सगळे कृती समितीचे मंडळी आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन आणि उपोषणाला बसले आहेत. आझाद मैदानावर हे उपोषण चालू असताना महाराष्ट्रातील सगळ्या बाजारपेठ पूर्णपणे बंद होतं कामकाज टप्प होतं. सरकारने वेगवेगळ्या प्रकारच्या आश्वासन दिली. बैठका झाल्या मुख्यमंत्री सगळे उपस्थित होते परंतु निर्णय झाला नाही. त्यामुळे पुढाकार घेऊन सरकारने उद्याच्या उद्या ही बैठक लावावी,” अशी विनंती आमदार शिंदे यांनी केली.
संयुक्त चिकित्सा समितीकडे चौकशी होऊन त्याची अंमलबजावणी झाली नाही. अधिवेशन संपल्यानंतर आचारसंहिता लागेल. ३४ हा कायदा आहे तो रद्द करण्यात यावा. दरवेळी नवनवीन कायदे काढण्यात येतात पण त्याबद्दल चर्चा करण्यात येत नाही. ३४ व ६४ असे पणन विभागाचे वेगवेगळे प्रकारचे कायदे काढलेले आहेत जेणेकरून बाजार समितीचे अस्तित्व पूर्णपणे संपले जाईल आणि त्याबरोबर माथाडी कायद्याला सुद्धा धोखा निर्माण होऊ शकतो, अशा पद्धतीची परिस्थिती आहे.
मुख्यमंत्र्यांना भेटून बैठक लावण्याची विनंती केली. तात्पुरत्या स्वरुपात स्थगित केलेले आहे ते पुढे निवडणुका झाल्यानंतर अधिवेशनाला पुन्हा काय निर्णय घ्यायचा तो घ्या पण मा. बाबा आढाव हे ९४ वर्षाचे जेष्ठ समाजवादी विचाराचे नेते आंदोलनाला बसले आहेत. या प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून काल विनंती केली की आपण पुढाकार घेऊन सरकारने उद्याच्या उद्या ही बैठक लावावी, अशी विनंती आमदार शिंदे यांनी यावेळी केली.