मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर शशिकांत शिंदेंनी राज्य सरकारकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची काल सातारा जिल्ह्यात शांतता रॅली पार पडली. या रॅलीनंतर जाहीर सभा सुरू असतानाच जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावल्यानंतर त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. उपचारानंतर जरांगे पाटील आजपुण्याकडे रवाना झाले तत्पूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातची भूमिका लवकरात लवकर स्पष्ट करावी आणि निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा, असे महत्वाचे विधान शिंदे यांनी केले.

साताऱ्यात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर आमदार शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मराठा समाजाला दिशा देण्याचे काम मनोजदादा प्राणपणाने करत आहेत. मराठा आंदोलनासाठी महाराष्ट्रात ज्या पद्धतीने अस्थिरता निर्माण केली जात आहे, ती दूर करण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिलो आहोत व सहभागी झालो आहोत.

हे सर्व करत असताना शासन दरबारी या आधीही नेहमीच मी पाठपुरावा करत आलो आहे व यापुढेही करत राहील अशी ग्वाही दिली. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातची भूमिका लवकरात लवकर स्पष्ट करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा आमदार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.