सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतमोजणीला (Satara Lok Sabha 2024 Result) पोस्टल मत मोजणीने ठीक आठ वाजता सुरुवात झाली. पोस्टल मतमोजणीत दुसऱ्या फेरीत महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना 9 हजार 983 मिळाली असून शशिकांत शिंदे यांना 12 हजार 626 मते पडली आहेत. शिंदे 7 हजार 500 मतांनी आघाडीवर आहेत. पोस्टल मतदानाद्वारे सुरू झालेल्या मतमोजणीत शिंदेंच्या बाजूने जनतेचा कौल असल्याचे पहायला मिळाले.
सातारा लोकसभा निवडणुकीत पहिल्या फेरीत पोस्टल मतमोजनीवेळी उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात मतांवरून अत्यंत अतीटतीची काटे की टक्कर झाल्याचे असल्याचे पहायला मिळाली. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत शिंदेंनी आपली तुतारी वाजवत उदयनराजेंना मागे टाकले आहे. शिंदेंना आतापर्यंत 36 हजार 679 इतकी मते पडली असून उदयनराजेंना 27 हजार 647 इतकी मते पडली आहेत. साताऱ्यात भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत होत आहे. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवड़णूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर या ठिकाणी शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली.
उदयनराजे यांच्यासाठी साताऱ्यात कराडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. उदयनराजेंना अखेरच्या क्षणी उमेदवारी जाहीर झाली होती. सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण मतदानाच्या ६३.१६ टक्के इतकं मतदान झालं आहे. साताऱ्यात एकूण मतदान १८ लाख ८९ हजार ७४० इतकं असून ११ लाख ९३ हजार ४९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. साताऱ्यात २३ फेरीत मतजमोजणी होणार आहे. सायंकळी सहा ते सात वाजेपर्यंत निकाल जाहीर होईल यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान झाले.