“सत्तेच्या माध्यमातून माझे राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न,पण…; माजी मंत्री शशिकांत शिंदे स्पष्टच बोलले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार शरद पवार हे आज सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधत. यावेळी त्यांच्यासोबत खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे उपस्थित होते. पवारांच्या पत्रकार पत्रकार परिषदेनंतर माजी मंत्री शिंदे यांनी त्यांच्यावर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कथित शाैचालय घोटाळ्या प्रकरणी करण्यात आलेल्या आरोपावर आपली भूमिका मंडळी. या घोटाळ्या प्रकरणी माझ्यावर आरोप जे जे झाले आहेत. त्या आरोपांशी व या प्रकारणाशी माझा कोणताही संबंध नाही. सत्तेच्या माध्यमातून राजकीय करिअर उध्वस्त करण्याचा प्रयत्न होत आहे. पण, विजय सत्याचाच होईल, असा दावा माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी यावेळी केला.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहात माजी मंत्री शिंदे यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाला सडेतोड उत्तर दिले. यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी मंत्री शिंदे म्हणाले, मुंबई बाजार समितीतील कथित शाैचालय घोटाळ्या प्रकरणात माझ्यासह चार अधिकाऱ्यांना आरेाप आहेत. मी प्रामाणिकपणे सांगतो की या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. माझे राजकीय कार्य थांबविण्यासाठी राजकीय प्रयत्न केले जात आहेत. गेली २५ वर्षे कष्ट आणि लोकांच्या बळावर मी उभा आहे. तरीही राजकीय पातळी इतक्या खाली जाईल असे वाटले नव्हते. हुकुमशाही पध्दतीने अधिकाराचा गैरवापर करण्यात येत आहे. खोट्या तक्रारी केल्या जात आहेत. निवडणुकीच्या तोंडावर दाबण्याचा हा प्रकार आहे. पण, मी त्वेषाने काम करणार असल्याचे शिंदे यांनी म्हंटले.