सातारा प्रतिनिधी । दास गॅस सेफ्टी इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्ट शशिकांत भंडारे यांना नुकताच एम्पावर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्टतर्फे ‘Business Icon Award 2025’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. एम्पावर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट तर्फे डायरेक्ट सेलिंग क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल एम्पावर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. घनश्याम कोळंबे, सीनियर नॅशनल प्रेसिडेंट डॉ. राज मोहन काळे, नॅशनल प्रेसिडेंट सोमशेखर, सीईओ सोनाली मेमाने यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
मुंबई येथील जिंजर हॉटेलमध्ये “भारत-निर्माण योगदान अवॉर्ड 2025” तसेच अमेरिकन युनिव्हर्सिटी तर्फे विविध क्षेत्रा मधील निपुण व यशस्वी लोकांना डॉक्टरेट डिग्रीने सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास पालघर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा, जॉर्जिओ इन मुंबईचे कौन्सिल जनरल सत्येन्द्र सिंह अहुजा, आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा, पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, पोलीस ऑफिसर एन्काऊंटर स्पेशलिस्ट श्री.प्रदीप शर्मा, राहुल ओहरा, ACP रेहाना शेख, अभिनेता श्री. नितीन देसाई, डॉ.अमजद खान पठाण, श्री. शिवा गौडा पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते .
“एम्पावर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट व भारत सरकारच्या MSME( सूक्ष्म लघु एवम मध्यम उद्यम),तसेच कौशल्य बलम, स्किल इंडिया, कुशल भारत, डिजिटल इंडिया, अर्पण,N.S.D.C ( नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कार्पोरेशन), सर्टिफाइड I.S.O. 9001-2015 कंपनी, नीती आयोग तसेच महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता संचालनालय यांच्या अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
समाजातील विविध क्षेत्रातील यशस्वी व निपुण लोकांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील सातारा शहरातील श्री. शशिकांत भंडारे यांना एम्पावर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट तर्फे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये विशेष योगदाना बद्दल भंडारे यांना Business Icon Award 2025 या पुरस्काराने गौरव करण्यात आला.
‘दास ग्रुप’चे मॅनेजिंग डायरेक्ट शशिकांत भंडारे यांनी दास गॅस सेफ्टी इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे सूर्या गॅस सेफ्टी डिवाइस उपलब्ध करून दास ग्रुप घरगुती गॅस सिलिंडर वापरणाऱ्या परिवारांसाठी गॅस सुरक्षा अभियान राबवले. या माध्यमातून कंपनीने मागील दहा वर्षापासून लाखो कुटुंबांना गॅस दुर्घटनेपासून सुरक्षित केलेले आहे. दास सूर्या बेवरेजेस फार्मची निर्मिती करून प्रत्येक कुटुंब आरोग्य दृष्ट्या सक्षम राहण्यासाठी आरोग्य सुरक्षा अभियान सुद्धा राबविले आहे.
सामाजिक कार्य करण्यासाठी सुमा फाउंडेशन निर्मिती करून सातारा जिल्ह्यासाठी फ्री ॲम्बुलन्स सेवा ही सुरू केली. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र राज्याबाहेरी राज्यातील १० हजारपेक्षा जास्त बेरोजगार वर्गातील मुला मुलींना व्यवसायिक मार्गदर्शन करून व्यवसायिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्याचे काम देखील दास ग्रुप ऑफ कंपनी करत आहे. यासाठी दहा वर्षात कंपनीला अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार ही मिळालेले आहेत. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महाराष्ट्र राज्य रमेश जी बैस यांच्या हस्ते देखील शशिकांत भंडारे यांचा गौरव करण्यात आला आहे.