‘दास ग्रुप’चे मॅनेजिंग डायरेक्ट शशिकांत भंडारे यांची प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना जागरूकता अभियान राज्य सल्लागारपदी नियुक्ती

0
11

कराड प्रतिनिधी । दास गॅस सेफ्टी इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्ट शशिकांत भंडारे यांची प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना जागरूकता अभियान राज्य सल्लागारपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष श्री अनित कुमार कौशिक यांच्या हस्ते भंडारे यांची नियुक्ती करण्यात आली.

‘दास ग्रुप’चे मॅनेजिंग डायरेक्ट शशिकांत भंडारे यांनी दास गॅस सेफ्टी इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे सूर्या गॅस सेफ्टी डिवाइस उपलब्ध करून दास ग्रुप घरगुती गॅस सिलिंडर वापरणाऱ्या परिवारांसाठी गॅस सुरक्षा अभियान राबवले. या माध्यमातून कंपनीने मागील दहा वर्षापासून लाखो कुटुंबांना गॅस दुर्घटनेपासून सुरक्षित केलेले आहे. दास सूर्या बेवरेजेस फार्मची निर्मिती करून प्रत्येक कुटुंब आरोग्य दृष्ट्या सक्षम राहण्यासाठी आरोग्य सुरक्षा अभियान सुद्धा राबविले आहे.

सामाजिक कार्य करण्यासाठी सुमा फाउंडेशन निर्मिती करून सातारा जिल्ह्यासाठी फ्री ॲम्बुलन्स सेवा ही सुरू केली. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र राज्याबाहेरी राज्यातील १० हजारपेक्षा जास्त बेरोजगार वर्गातील मुला मुलींना व्यवसायिक मार्गदर्शन करून व्यवसायिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्याचे काम देखील दास ग्रुप ऑफ कंपनी करत आहे. यासाठी दहा वर्षात कंपनीला अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार ही मिळालेले आहेत. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महाराष्ट्र राज्य रमेश जी बैस यांच्या हस्ते देखील शशिकांत भंडारे यांचा गौरव करण्यात आला आहे.

‘दास ग्रुप’चे मॅनेजिंग डायरेक्ट शशिकांत भंडारे यांनी केलेल्या व्यावसायिक आणि सामाजिक उपक्रमाची दखल घेऊन त्यांची प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना जागरूकता अभियान राज्य सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
तसेच मागील वर्षी मुंबई येथे राष्ट्रीय सेवा पुरस्कार राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते भंडारे यांनी स्वीकारून कंपनीचा गौरव ही करण्यात आला होता.

राज्य सल्लागारपदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार : शशिकांत भंडारे

प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना जागरूकता अभियान राज्य सल्लागारपदी माझी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष श्री अनित कुमार कौशिक यांनी केलेल्या नियुक्तीबद्दल मी कौशिकजी यांचे आभार मानत आहे. माझ्यावर देण्यात आलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याची प्रतिक्रिया ‘दास ग्रुप’चे मॅनेजिंग डायरेक्ट शशिकांत भंडारे ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली आहे.