लाडकी बहीण योजना सत्ताधाऱ्यांना किती फायद्याची अन् तोटीची?; साताऱ्यात शरद पवारांचे महत्वाचे विधान

0
4
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून महायुतीवर टीका केली. “लोकांना खूश करण्यासाठी त्यांनी लोकांना आनंदी ठेवणारी योजना आणली, लोकांना पैसे दिले. योजना किती दिवस टिकणार याची माहिती द्यायला हवी होती. आज निवडणुका काढायच्या ही त्यांची मानसिकता आहे. लाडकी बहीण योजनेतून महिन्याला पैसे देऊन त्यांनी महिलांना खुश केलं, पण त्याचा फार परिणाम होणार नाही. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचे आणि दुसरीकडे स्त्रियांवर अत्याचार होत आहे. महिला गायब होत आहे. त्याचा काही परिणाम होईल ना, असे पवार यांनी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज सातारा जिल्हा दौऱ्यावर असून आज त्यांच्या उपस्थितीत वाई, कोरेगाव, दहिवडी आणि फलटण येथे चार सभा होणार आहे. सभेस जाण्यापूर्वी पवार यांनी साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सहा महिन्यांपूर्वीच्या निवडणुकीत आम्ही एकदम ३० वर गेलो. याचा अर्थ लोकांना मोदींची भूमिका पसंत नव्हती हे महाराष्ट्रात दिसत होतं. साताऱ्यातही आमची एक जागा आली असती. एकंदर चित्र गेल्या निवडणुकीप्रमाणे न बोलणारं आणि मतदानाच्या दिवशी रिअॅक्ट होणारं आहे.आताची स्थिती वेगळी आहे.

अजित पवारांच्या‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणाले…

राज्यात महिलांवरील अत्याचारांचा घटना वाढल्या आहेत. शेतकऱ्यांचा आत्महत्या देखील वाढल्या आहेत काम नाही नोकऱ्या नाहीत तरुण पिढी मध्ये निराशा आहे सत्तेचा वापर निवडणूक जिंकण्यासाठी केला जातो आहे लोकांना परिवर्तन हवं आहे मी अनेक पांतप्रंधनाची भाषणे ऐकली आहेत नरेंद्र मोदी यांनी चारशे जागांवर प्रचार सुरू केला हा संविधानाला धोका आहे हे आम्ही लोकांसमोर मांडणार आहे. अदानी चा घरी गेलो होतो मात्र बैठक झाली की नाही वोट जिहाद हा शब्द वापरुन देवेंद्र फडणवीसांचे सहकारी धार्मिक कलह निर्माण करण्याचा प्रयत्न करतायेत महिलांना दिड हजार देऊन खुश केल जातय राज्यातील लोकांना परिवर्तन पाहिजेत गेल्या काही दिवसापासून फिरतोय होय अदानींसोबत बैठक झालीय त्यावेळी मी होतो लोकांनी म्हणावं लागतं आपण म्हणून उपयोग नाही असे उत्तर शरद पवार यांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर दिले.

फडणवीसांनी ‘व्होट जिहाद’वरून चढवला हल्ला

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपने ‘कटेंगे तो बटेंगे’, ‘एक है तो सेफ’, या घोषणांबरोबरच ‘व्होट जिहाद’चा मुद्दा लावून धरला आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना भाजपने आता व्होट जिहादच्या मुद्द्यावर जास्त जोर दिला असून, देवेंद्र फडणवीसांनी खडकवासला येथील सभेत मौलाना सज्जाद नोमानी यांचा व्हिडीओ दाखवत महाविकास आघाडीवर व्होट जिहादचा आरोप केला आणि हल्ला चढवला. याला शरद पवारांनी साताऱ्यात बोलताना उत्तर दिले.

१५०० रुपये देऊन महिलांना खूश केलं पण त्याचा फारसा परिणाम होणार नाही.

सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्यांना लोकसभा निवडणुकीचा जो फटका बसला, त्याची त्यांनी सीरिअस नोंदघेतली. लोकांना खूश करण्यासाठी त्यांनी लोकांना आनंदी ठेवणारी योजना आणली, लोकांना जास्तीत जास्त पैसे दिले. योजना किती दिवस टिकणार याची माहिती द्यायला हवी होती. पण त्यांनी दिली नाही. आज निवडणुका काढायच्या ही त्यांची मानसिकता आहे. उदा. लाडकी बहीण. दोन कोटी महिलांना १५०० रुपये दिले. त्यांना महिलांना खूश केलं. पण त्याचा परिणाम काही ना काही होईल. एवढे पैसे वाटले. पण फार परिणाम होणार नाही.

सरकार सत्तेचा गैरवापर करतय

पीक हातातून जात आहे. काही भागात सोयाबीन आणि कापूस महत्त्वाचा आहे. त्याच्या किंमती जास्त आहे. त्यामुळे शेतकरी नाराज आहे. त्यांच्या आत्महत्या होत आहे. तिसरा प्रश्न आहे, तो म्हणजे शैक्षणिक संस्था वाढल्या. लोक शिकत आहे. संधी मिळत आहे. पण काम कुठे आहे. नोकरी नाही. रोजगार नाही. तरुणांसमोर प्रश्न आहे. त्यामुळे अनेक प्रश्न आहे. हे प्रश्न मांडणं आमचं काम आहे. दुसऱ्या बाजूला सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे. निवडणुका जिंकण्यासाठी ते पाऊल टाकत आहे, अशी टीका पवार यांनी यावेळी केली.

६४ हजार महिला आणि मुली राज्यात बेपत्ता

एकीकडे सरकारने मदत केली. पण महिलांवर अत्याचार वाढले आहे. माझ्याकडे आकडेवारी आहे. दोन वर्षात ६७ हजार अत्याचार महिलांवर झाले. ही लहान गोष्ट झाली नाही. मुली किंवा स्त्रिया बेपत्ता होण्याची माहिती आहे. ६४ हजार महिला आणि मुली राज्यात बेपत्ता आहे. त्यात गृहमंत्री ज्या जिल्ह्यातील आहे, त्या नागपुरातील ही नोंद होत आहे. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचे आणि दुसरीकडे स्त्रियांवर अत्याचार होत आहे. महिला गायब होत आहे. त्याचा काही परिणाम होईल ना, अशा शब्दांत शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं.